fbpx
Monday, June 17, 2024
PUNESports

91 सायकलपटूंनी केली 1400 वेळा येरवडयातील तारकेश्वर टेकडी सर

पुणे – शारीरीक आणी मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहावे यासाठी आयोजित केलेल्या सायकल चालवा, तंदुरुस्त रहा या उपक्रमाला येरवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला . 91 सायकलपटूंनी एकूण 1400 वेळा तारकेश्वर टेकडीवर चढाई करून विक्रम केला.रायडर्स ग्रुपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनिल टिंगरे उपस्थित होते .

या उपक्रमाची माहिती देताना चेतन विभुते म्हणाले, ” कोरोना या जागतिक महामारीने सर्वजण होरपळून निघाले आहेत. यामुळे मानवाला आपल्या शारिरीक तंदुरुस्तीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. त्यानुसार व्यायामाचा एक सोपा भाग म्हणून सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यासाठीच रायडर्स ग्रुपने सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी येरवडा येथील तारकेश्वर टेकडीवर सायकल चालवून चढाई करण्याचा उपक्रम आयोजीत केला होता. या उपक्रमात ९१ स्त्री – पुरुष सायकलपटूनी सहभाग नोंदवला. याच उपक्रमात जेष्ठ नागरिक व सायकलपटूची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टकडून करण्यात आली. टेकडीवर चार ते पाच ठिकाणी स्वयंसेवकाद्वारे मदत करण्यात येत होती. डॉ. सुभाष कोकणे यांनी सुमारे ७१ वेळा टेकडीवर सायकलिंग करुन आपला ७१ वा वाढदिवस यावेळी साजरा केला. बिपिन उंद्रे यानी १२५, विजय हिंगे यांनी १११, सचिन घोगरे यांनी १००, शिशुपाल तोमर यांनी ५६ वेळा चढाई केली. सर्व ९१ सायकलपटू मिळून ठरावीक कालावधीत १४०० वेळा टेकडी चढण्याचा विक्रम करण्यात आला.
गौतमी पाटील (वय वर्ष १०) व यश पाटील (वय वर्ष ११) या बहिण-भावानी ही आनंद व उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवून ४ वेळा चढाई केली.हा
उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिशुपाल तोमर, संजय सूर्यवंशी व किरण कलशेट्टी यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading