Saturday, June 13, 2026
Business

महिंद्रा व फोर्ड यांच्या संयुक्त कंपनीच्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई –  महिंद्रा अँड महिंद्रा ही महिंद्रा समुहातील 19.4 अब्ज डॉलरची उलाढाल असलेली प्रमुख कंपनी आणि फोर्ड मोटर कंपनी या दोघींनी एक संयुक्त वाहन उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय आता मागे घेतला आहे. संयुक्त उत्पादक कंपनी स्थापन करायची, असे दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये ठरविले होते व तसा करारही करण्यात आला होता; तथापि 31 डिसेंबर 2020 रोजी या कराराची मुदत संपल्यामुळे तो कालबाह्य (लॉंगस्टॉप) झाला असून त्यावरील चर्चा दोन्ही कंपन्यांनी थांबविली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या कंपन्यांच्या मते, हा करार प्रथम जाहीर झाल्यापासून जागतिक आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थितीत मूलभूत बदल झाला आहे. त्यास काही प्रमाणात जागतिक महामारी कारणीभूत आहे. या बदलांमुळे फोर्ड आणि महिंद्रा यांनी आपापल्या भांडवली गुंतवणुकींच्या अग्रक्रमांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेतले.

या निर्णयाचा आपल्या उत्पादनाच्या नियोजनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे महिंद्रातर्फे सांगण्यात आले. आर्थिक कार्यक्षमतेवर अधिक भर देत, ही कंपनी आपल्या मूळ एसयूव्ही वाहनांच्या विभागात आणि उत्पादन प्लॅटफॉर्ममध्ये भक्कम उभी आहे. याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये नेतृत्व स्थापित करण्याच्या प्रयत्नांनाही महिंद्रा गती देत ​​आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading