Monday, June 15, 2026
ENTERTAINMENT

नेहा आणि रोहनप्रीत पुन्हा करणार लग्न?

आजच्या काळात एका संगीतकाराला अन्य कोणत्याही व्यवसायिकासारखाच दर्जा मिळतो. हे सगळे शक्य झाले आहे, ते इतकी वर्षे आपल्याकडे जे प्रतिभावान संगीतकार, गायक होऊन गेले, झाले, त्यांच्यामुळे. या प्रक्रियेत सिंहाचा वाटा उचलणारा एक शो म्हणजे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल आणि आता इंडियन आयडॉल 2020 या नव्या सत्राच्या माध्यमातून हा शो देशाला नक्कीच आणखी काही अद्भुत गायक, संगीतकार देऊन जाईल. या वीकएंडला इंडियन आयडॉलमध्ये असेल शादी स्पेशल भाग, ज्यात उपस्थित असतील, नेहा कक्कडचा पती रोहनप्रीत सिंह आणि कॉमेडी किंग आणि क्वीन हर्ष आणि भारती.

षण्मुखप्रिया आणि पवनदीप यांनी ‘ओ मारिया’ गाण्यावर उत्तम परफॉर्म केले. त्या गाण्याच्या ठेक्यावर परीक्षकांनी फक्त डान्स केला नाही, तर अशी टिप्पणी देखील केली की, त्यांचा हा परफॉर्मन्स खूपच छान होता आणि त्यामुळे कार्यक्रमाचा दर्जा आणखी उंचावला आहे.

अलीकडेच विवाहबद्ध झालेल्या नेहा कक्कडने आपला पती रोहनप्रीत सिंह याच्याकडे मागणी केली की, तिला व्हाइट वेडिंग सुद्धा करायचे आहे. ती म्हणाली, मी हिंदू रीतीरिवाजानुसार रंगीत पोशाख परिधान करून विवाह केला. आता मला सुंदर सफेद पोषाखात विवाह करायचा आहे. तिने आपल्या पतीला विचारले की, ख्रिस्ती परंपरेनुसार त्या दोघांना पुन्हा एकदा लग्न करता येईल का?

आपल्या परफॉर्मन्सनंतर षण्मुखप्रिया आणि पवनदीप म्हणाले, “आमची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला इतका मोठा मंच मिळाला हे आम्ही आमचे भाग्य मानतो आणि आम्ही ही खबरदारी घेऊ की, या मंचाचा उपयोग आम्ही योग्य पद्धतीनेच करू आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांचा अपेक्षाभंग आम्ही होऊ देणार नाही.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading