रूपेची पेनियरबायच्या सहकार्याने ‘रूपे पीओएस’ लाँच करण्यासाठी आरबीएल बँकेशी भागिदारी
मुंबई – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) रूपे आणि आरबीएल बँकेने भागिदारी केली असून त्याअंतर्गत पेनियरबायच्या सहकार्याने भारतीय व्यापाऱ्यांसाठी ‘रूपे पीओएस’ ही नाविन्यपूर्ण पेमेंट सुविधा लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. रूपे पीओएस रिटेलर्ससाठी स्मार्टफोनचे व्यापाऱ्याxच्या पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनलमधे रूपांतर करेल. यामुळे व्यापाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंतचे व्यवहार त्याच्या एनएफसी अनेबल्ड मोबाइल फोनवरून संपर्कविरहीत पद्धतीने केवळ टॅप अँड पे सुविधा वापरून करता येईल. रूपे कार्ड वापरणाऱ्या किंवा रूपे कार्ड्स टोकनाइज्ड करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या नेहमीच्या खरेदीसाठी संपर्कविरहीत पद्धतीने पैसे भरता येतील.
रूपे पीओएसद्वारे रिटेलर्सना कोणत्याही अतिरिक्त भांडवली खर्चाशिवाय किफायतशीर स्वीकारार्ह पायाभूत सुविधा मिळतील. या अभिनव उत्पादनामुळे आवश्यक सुविधांपासून वंचित असलेल्या लाखो भारतीय एमएसएमईजमधे डिजिटल पेमेंट्सचे प्रमाण वेगाने वाढेल. व्यापाऱ्यांना केवळ त्यांचे पेनियरबाय अप अद्यावत करून त्यांच्या अँड्रॉइंड स्मार्टफोनचे पेमेंट स्वीकृती करणाऱ्या टर्मिनलमधे रूपांतर करता येईल. रूपे पीओएसच्या मदतीने दुर्गम भागातील अगदी जवळच्या स्थानिक दालनांनाही आता त्यांच्या स्मार्टफोनवर संपर्कविरहीत पेमेंट प्रक्रिया करता येईल.
प्रायोगिक तत्वावर रूपे पीओएस रूपे एनसीएमसीचे ऑफलाइन व्यवहारही स्वीकारणार असून पर्यायाने ऑनलाइन व ऑफलाइन कार्ड पेमेंट्ससाठी सोप्या स्वीकृती पायाभूत सुविधा मिळतील. 200 रुपयांखालच्या व्यवहारांसाठी ऑनलाइन पडताळणीची गरज पडणार नसून त्यामुळे हे व्यवहार जलद आणि रोख पैशांची देवाणघेवाण करण्याइतपत सोपे होतील. यामुळे छोट्या भुगतान प्रक्रियांसाठी इंटरनेटवर अवलंबून न राहाण्याचा आणि त्याचवेळेस ग्राहकांसाठी विनाअडथळा खरेदी करण्याचा अनुभव मिळवून देण्याचा दुहेरी हेतू साध्य होणार आहे.
आरबीएल बँकेच्या डिजिटल पेमेंट्स आणि संपादन विभागाचे प्रमुख पुष्पेंद्र शर्मा म्हणाले, ‘रूपे पीओएस ही अनोखी सुविधा उपलब्ध करण्यासाठी रूपे आणि पेनियरबाय यांच्याबरोबर भागिदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. डिजिटल पेमेंट क्षेत्रांचे रूपांतर करणे तसेच सुरक्षित व सोयीस्कर व्यवहार पद्धती उपलब्ध करून देणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. स्मार्टफोन्सचा वापर वाढल्यामुळे आणि रूपे नेटवर्क दूरवर पोहोचलेले असल्यामुळे डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करणे देशभरातील लाखो ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी सोपे व किफायतशीर ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो. या नाविन्यपूर्ण सुविधेच्या मदतीने आरबीएल बँकेमधे आम्ही आमची भौगोलिक व्याप्ती आणि ग्राहकवर्ग विस्तारण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला विश्वास वाटतो, की रूपे पीओएससारखी अनोखी सुविधा भारतात रोखीशिवाय अर्थव्यवस्थेच्या क्रांतीच्या दिशेने घेऊन जाईल.’
पेनियरबायचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले, ‘देशात ‘आत्मनिर्भर भारत’ पेमेंट सुविधांचे नेतृत्व करण्यासाठी डिजिटल पेमेंट अनेबलर होण्याचे पेनियरबायचे ध्येय आहे. रूपे पीओएसच्या माध्यमातून सोप्या आणि जलद डिजिटल पेमेंट्ससाठी स्वीकृती पॉइंट्स समाविष्ट करून एक यंत्रणा उभारण्याचा आमचा विचार आहे. ही किफायतशीर सुविधा देशातील 30 दशलक्षांपेक्षा जास्त लघु व मध्यम व्यापाऱ्यांसाठी, त्यांना सोपी, संपर्कविरहीत पेमेंट सुविधा पुरवून सक्षण करण्यासाठी बनवण्यात आली आहे. लास्ट- माइल कनेक्टिव्हिटीला सोप्या डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत रिटेलर्स व ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. याच पद्धतीने आम्ही समान पातळीवर असलेला डिजिटल भारत बनवण्यासाठी सर्वसामान्यांमधली डिजिटल दरी सांधणार आहोत.’
एनपीसीआयच्या रूपे आणि एनएफएस विभागाचे प्रमुख नलिन बन्सल म्हणाले, ‘नाविन्यपूर्ण रूपे पीओएस सुविधा लाँच करून देशभरातील व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात समाविष्ट होण्यासाठी सक्षम करण्याच्या हेतूने पेनियरबाय, पेनेक्स्ट, युविक आणि आरबीएल बँकेशी सहकार्य करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. स्मार्टफोनचे पीओएस मशिनमधे रूपांतर करण्याच्या या क्रांतीकारी यंत्रणेमुळे डिजिटल सुविधांची व्याप्ती विस्तारण्यास आणि देशातील स्वीकृती पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे पर्यायाने व्यापारी तसेच ग्राहकांना सफाईदार व्यवहारांचा अनुभव घेता येईल. या उपक्रमामुळे व्यापारी व ग्राहकांचे रोखीवरील अवलंबित्व कमी होईल तसेच भारताचा लेस- कॅश अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेल्या प्रवासाला चालना मिळेल.’
