श्री सद्गुरू बाळूमामा बहुउद्देशीय संस्थेच्या वर्ष 2021 या दिनदर्शिकेचे अनावरण
पिंपरी, प्रतिनिधी : चिंचवडेनगर येथील श्री सद्गुरू बाळूमामा बहुउद्देशीय संस्थेच्या वर्ष 2021 या दिनदर्शिकेचे अनावरण नुकतेच पाटील पॅलेस, वाल्हेकरवाडी रस्ता येथे करण्यात आले.
याबाबत बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी सांगितले, की संस्थेच्या या दिनदर्शिका सुमारे पाच हजार नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत, गरजू लोकांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत, तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. याबरोबरच रोजगार मेळाव्याचे आयोजन करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे. तसेच चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी येथे संत सदगुरु बाळूमामा याचे मंदिर बांधण्याचा संस्थेच्या मानस आहे. हे कार्य पूर्ण होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व समाजबांधवांनी संस्थेच्या पाढीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्षश्री. बंडू मारकड पाटील डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. दिनेश गाडेकर, उदोजक अजय दुधभाते, वाघमोडे सर, राजेंद्र शेळके, डॉ.रवींद्र कुरवाडे, प्रा.प्रसाद वायकुळे सर,आशिष शेळके, मनोजकुमार मारकड, सचिन कोपनर सर, विजय सरक, हुनंमत सरक, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, बिभिषिण घोडके, संभाजी यमगर, सुनील बनसोडे, महावीर काळे, संजय नायकवाडे, हिराकांत गाडेकर, संतोष पाढरे, हाके सर, माऊली वाघमोडे, यशोदा नायकवाडे, सुप्रिया वायकुळे,अक्षय वायकुळे, सुजित सोट, अभिजित वायकुळे, महादेव वायकुळे, शिवाजी आवारे, सतिश पाटील, रेवण शेळके, बिरमल मारकड, सुरेश मारकड, प्रभाकर कोळेकर, विनोद बरकडे, सचिन सलगर, किरण ठेंगल,महादेव देशमुख, अशोक मारकड, भाऊसाहेब ढवरे, महेंद्र कोपनर, नितिन कोपनर, बापू कदम, गणेश गोफणे,प्रसाद मारकड पाटील गणेश देवकते तसेच चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ वायकुळे यांनी, तर आभार सचिन कोपनर यांनी मानले.
