Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNE

२४ तास सेवा देणाऱ्या राज्यातील पहिल्या डेंटल क्लिनिकचे उदघाटन 

पुणे – असह्य दातदुखी,रक्तस्त्राव अशा प्रसंगी रात्रंदिवस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या राज्यातील पहिल्या डेंटल क्लिनिकचे उदघाट्न सोमवारी आझम कॅम्पस येथे झाले.एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेज आणि युनानी मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे सुरु केलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते झाले. 

यावेळी बोलताना या डेंटल क्लिनिक चे प्रमुख डॉ जे बी गारडे म्हणाले,’इमर्जन्सी इनफेक्शन मॅनेजमेंट,ओरल -मॅक्सीलोफेशल भागातील तातडीचे उपचार,इमर्जन्सी ऍक्यूट पेन मॅनेजमेंट,पोस्ट एक्सट्रॅक्शन ब्लीडींग मॅनेजमेंट साठी हे २४ तास उपलब्ध असणारे डेंटल क्लिनिक उपयोगी ठरू शकते’. 

डॉ पी ए इनामदार म्हणाले,’आधुनिक आणि लोकोपयोगी सेवा देण्यामध्ये,संशोधन करण्यामध्ये आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यामध्ये रंगूनवाला दंत रुग्णालय राज्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहे.२४ तास सुरु राहणाऱ्या या डेंटल क्लिनिकमुळे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.’

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,डॉ नाझीम शेख,डॉ जलिस अहमद,डॉ रमणदीप दुग्गल,आर ए शेख,डॉ मुश्ताक मुकादम,मुझफ्फर शेख,प्रा.इरफान शेख,आसिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading