‘अवामी महाज’ सामाजिक संघटनेतर्फे मास्क वाटप
पुणे – ‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटनेतर्फे शहरात विविध ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले. कोहिनूर चौक,संत कबीर चौक, हाथी महल चौक, ज्योती चौक कोंढवा ,आझम कॅम्पस येथे वाटप करण्यात आले. आबेदा इनामदार,लतीफ मगदूम,हाजी कदीर कुरेशी ,अफझल खान ,वाहिद बियाबानी, नासीर खान ,शाहिद शेख,वहाब शेख , आसिफ शेख, शबीर इनामदार, मौलाना काझमी, हसन कुरेशी,अफसर कुरेशी ,अयाझ जहागीरदार,सिराज शेख इत्यादी उपस्थित होते. तैय्यबिया ऑरफनेज येथे तनवीर इनामदार,मुमताझ सय्यद ,वाहिद बियाबानी यांच्या हस्ते मास्क ,केक ,मिठाई वाटप करण्यात आले.तन्वीर इनामदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
