आरोग्य व निरोगी जीवनासाठी आनंद संघाचे पहिले ग्लोबल रिट्रीट जाहीर
पुणे – आज आनंद संघ आपल्या ५० हून अधिक वर्षांच्या कार्यकालामध्ये महान परमहंस योगानंद यांची सार्वत्रिक शिकवण आत्मसात करुन, जागतिक समस्येवर यशस्वी पर्यायी निराकरणे प्रदान करत आहे. आधुनिक संशोधनाद्वारे पाठबळ मिळवलेल्या आनंद संघाने आरोग्यसंबंधी व योगविषयक शिकवणुकीचे शाश्वत ज्ञान जगासमोर सामायिक केले आहे आणि आनंद संघ आता या क्षेत्रातील
विश्वासू ट्रस्ट बनला आहे. हे भारतातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत आहे आणि मागील काही वर्षांमध्ये लोकांच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
आनंद संघाने पहिल्यांदाच “रिचार्ज हेल्थ रिट्रीट” नावाचा ग्लोबल ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याचे आयोजन ७ ते १० जानेवारी २०२१ पर्यंत होईल.
ग्लोबल हेल्थ रिट्रीट हा कार्यक्रम जागरुकता, प्रॅक्टिकल टूल्स आणि तंत्रे घेऊन येईल, यातुन सर्वांसाठी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि निरोगी दृष्टीकोणातुन लोकांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न होईल. यात नॅचरोपॅथी, पारंपारिक चीनी चिकित्सा, योग आणि इतर विषयांचे तज्ञांचे ग्लोबल मल्टी-डिसिप्लिनरी फोरम प्रथमच एकत्र येणार आहे. चालू साथीचा रोग हा सर्व देशस आरोग्याविषयी दृष्टीकोणातुन मिळालेले आव्हान आहे. लोक असुरक्षित आणि चिंताग्रस्त आहेत. चांगल्या जागृती साठी आनंद संघाने प्रशंसनीय डॉक्टर आणि तज्ञ यांना एकत्र केले, ज्यांनी अनेक दशके संशोधन आणि अभ्यासातुन अग्रगण्य वैकल्पिक निराकरणे विकसित केली आहेत. या द्वारे आरोग्याबद्दल नवीन अंतर्दृष्टी समजून समृद्ध होता येईल, प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी, लवचिकता विकसित करण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी सोपी व्यावहारिक साधने आत्मसात करता येतील.
लाइफस्टाईल मेडिसिनच्या क्रांतिकारक दृष्टीकोनातून प्रख्यात डॉ. डीन ऑर्निश, न्यूरोथॉलॉजीच्या अग्रगण्य संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. अॅन्ड्र्यू न्यूबर्ग, पद्मभूषण डॉ. बी. हेगडे आणि इतर अनेक जागतिक तज्ञांचा यात समावेश आहे.
