‘मायगेट’तर्फे 15 हजार सोसायट्यांसाठी एफडीए-प्रमाणित ‘आय2क्यूअर बायोशील्ड’
मायगेट या स्टार्टअप कंपनीने आपल्या 15 हजारांहून अधिक ‘गेटेड कम्युनिटीं’ना कोविडच्या साथीपासून वाचविण्याकरीता ‘आय2क्यूअर’ या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ‘आय2क्यूअर’चे ‘बायोशील्ड’ हे पेटंट असलेले अॅंटीसेप्टिक लोशन असून ते एकल-वापर स्वरुपाचे ‘ब्रॉड-स्पेक्ट्रम अॅंटीमायक्रोबियल’ आहे. ते त्वचेवर लावल्यावर ‘कोविड-19’च्या विषाणूपासून सहा तासांसाठी आयोडीनचे संरक्षण मिळवून देते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली विविध प्रकारची अल्कोहोलयुक्त द्रावणे ही केवळ ‘डिसइन्फेक्टंट’ स्वरुपाची आहेत. ‘आय2क्यूअर’च्या सोल्युशनचे जागतिक सादरीकरण येत्या जानेवारी 2021 मध्ये करण्याचे नियोजन झाले असले, तरी ‘मायगेट’ने हे अत्याधुनिक उत्पादन त्यापूर्वीच मिळवून आपल्या अखत्यारीतील देशभरातील सोसायट्यांची काळजी घेण्याचे ठरविले आहे. बाजारातील वरवरच्या स्वरुपातील ‘डिसइन्फेक्टंट्स’ची उपयुक्तता मर्यादीतच असते, हे ‘मायगेट’ने ओळखले आहे. दोन्ही कंपन्यांच्या सहयोगामुळे ‘गेटेड कम्युनिटीं’ना विषाणूंपासून संरक्षण करण्यात ‘मायगेट’चे सहकार्य लाभणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ‘मायगेट’चे मुख्य कार्यान्वयन अधिकारी व सहसंस्थापक अभिषेक कुमार म्हणाले, “मायगेट’च्या सहयोगामुळे ‘गेटेड कम्युनिटीं’ना ‘आय2क्यूअर’चे ‘बायोशील्ड’ उपलब्ध होणार आहे. आमच्या कम्युनिटींसाठी हे आयोजन करण्यात आम्हाला अभिमान वाटत आहे. कोविडच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी कम्युनिटींनी या उत्पादनामध्ये कुतूहल दाखविले होते. शहरी भागांतील साथ रोखण्याची लक्षणीय क्षमता या उपक्रमामध्ये आहे.”
‘आय2क्यूअर’चे विपणन धोरण व वितरण विभागाचे संचालक रमेश मेनन म्हणाले, “कोविड-19’ला प्रतिबंध घालण्यासाठी जनतेला उपलब्ध होणारे आमचे हे उत्पादन सर्वात जास्त परिणामकारक आहे. ‘मायगेट’च्या 15 हजार ‘गेटेड कम्युनिटीं’ना हे उत्पादन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही या कंपनीशी केलेल्या भागीदारीबद्दल आनंद आहे. यामुळे या कम्युनिटींमधील लाखो रहिवाशांचे विषाणूपासून संरक्षण होईलच, त्याशिवाय त्यांच्या संपर्कात दररोज येणाऱ्या घरकामगार, डिलिव्हरी कर्मचारी यांसारख्या लाखोजणांनाही या संरक्षणाचा लाभ मिळेल.”
शैक्षणिक संस्था व कार्यालये बंद असण्याच्या, तसेच सार्वजनिक वाहतूकव्यवस्था कमी असण्याच्या सध्याच्या काळात, ‘गेटेड कम्युनिटीं’मधील रहिवासी एकमेकांच्या जास्त संपर्कात येत आहेत व त्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही त्यांच्यातच जास्त आहे. अर्थात, सोसायटीमध्ये येणाऱे अभ्यागत व कर्मचारी यांना मास्क घालणे अनिवार्य करणे, प्रत्येक प्रवेशद्वारावर त्यांचे तपमान मोजणे असे विविध प्रकारचे खबरदारीचे उपाय बहुसंख्य गृहनिर्माण सोसायट्यांनी योजलेले आहेत; तरीदेखील पृष्ठभागांवरून विषाणूंचा प्रसार होण्याची जोखीम शिल्लक राहतेच. ‘बायोशील्ड’मुळे या जोखमीपासून सोसायट्यांमधील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण होते आणि सोसायटीअंतर्गत जनजीवन पुन्हा सुरळीत होणे शक्य होते.
सॅनिटायझर लावल्यावर तेवढ्यापुरते संरक्षण मिळते. ‘बायोशील्ड’मधील ‘मॉलिक्यूलर आयोडीन सोल्युशन’ हे त्वचेच्या आत झिरपते आणि विषाणू व जीवाणू यांच्यापासून संरक्षणासाठीचे एक कवच बनविते. हे कवच 6 तास राहू शकते. प्रवेशद्वारावर किंवा घरातही एकदा लावल्यावर, रहिवाशांचा विषाणूच्या संसर्गापासून बचाव होतो. यामुळे विषाणूवाहकांच्या संख्येत लक्षणीय घट होते आणि साथीचा फैलाव होण्याची साखळी तुटते. अमेरिकेतील ‘इंटरटेक लॅब्ज’ने ‘आय2क्युअर’ची चाचणी घेतलेली असून ते परिणामकारक असल्याचे प्रमाणित केले आहे. डॉ. जॅक केसलर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्पादन विकसीत झाले आहे. ‘मॉलिक्यूलर आयोडीन’वर त्यांनी 2 दशके केलेल्या संशोधनामुळे या क्षेत्रात बरीच प्रगती झालेली आहे, तसेच ‘आय2क्यूअर’चाही विकास साध्य झाला आहे. डाग पडणे, खाजणे, विषारी परिणाम व अॅसिडोसिसची जोखीम असे कोणतेही नकारात्मक परिणाम ‘आय2क्यूअर’मुळे होत नाहीत. जागतिक सादरीकरणाबरोबरच, ‘बायोशील्ड’चे व्यापक वितरण करण्यासंदर्भात विविध सार्वजनिक आरोग्य केंद्रांशी ‘आय2क्यूअर’ची चर्चा सुरू आहे.
कोविड साथीच्या काळात, आपल्या अखत्यारीतील समुदायांमधील 25 लाख रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘मायगेट’ने अनेक वैशिष्ट्ये सादर केली आहेत व अनेक ठिकाणी भागीदारी केली आहे.
