वॉटस् अॅपद्वारे होणार मी सावरकर नि:शुल्क दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा
पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सावरकर – एक अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ आॅडिओ आणि व्हिडीओ द्वारे ही स्पर्धा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे, हे या स्पर्धेचे वेगळेपण आहे़. दि. १० जानेवारी २०२१ ही रेकॉर्डिंग पाठविण्याची अंतिम तारीख आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून जगभरातून कुठूनही या स्पर्धेमध्ये कोणालाही सहभागी होता येईल़ वक्तृत्व स्पर्धेबरोबरच काव्य निरूपण तसेच वीर सावरकरांच्या नाट्यवाचनाचे सादरीकरण यांचाही समावेश करण्यात आला आहे़.
यंदा संगीतमय सावरकर ही वेगळी संकल्पना असलेली स्पर्धा होणार असून यामध्ये सावरकरांच्या कवितांचे नव्या चालीत सादरीकरण करावयाचे आहे. याची संकल्पना पंडित शौनक अभिषेकी यांची आहे. स्पर्धा संयोजनासाठी सीए धनंजय बर्वे , सीए रणजीत नातू, सीए अमेय कुंटे, शैलेश काळकर, प्रवीण गोखले,कॅप्टन निलेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे स्पर्धेचे सह-संयोजक आहेत. स्पर्धेचे यंदा ४ थे वर्ष असून विविध शहरांतून स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षात स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील ५०० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या होत्या.
स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी सात मिनिटे आणि नाट्य वाचनासाठी दहा मिनिटांचा कालावधी असेल़ ही स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून घेतली जाईल़ या स्पर्धा विविध आठ गटांमध्ये होणार आहेत़.
प्रत्येक गटासाठी पहिले बक्षीस दहा हजार रूपये, दुसरे बक्षीस पाच हजार आणि उत्तेजनार्थ एक हजारांची पाच बक्षीसे असणार आहेत़ आठ गटातील आठ प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येईल़ त्याला अंदमानचीअभ्याससफर करण्यासाठी विमानाने ये-जा तसेच तेथील वास्तव्याचा खर्च देण्यात येईल़ तसेच सावरकर पुण्यतिथीनिमित्त अंदमान येथे होणाºया कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी mesavarkar.com या वेबसाईटवर तसेच mesavarkar@gmail.com या मेलवर किंवा ९८२२०३४५६१ या क्रमांकावर संपर्क करावा़ वॉटस् अॅपद्वारे होणार मी सावरकर नि:शुल्क दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा
