Tuesday, June 16, 2026
PUNE

दत्तजयंती उत्सवात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात केवळ विश्वस्तांच्या उपस्थितीत होणार दत्तजन्म सोहळा

पुणे : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंतीनिमित्त मंगळवार, दिनांक २९ डिसेंबर रोजी पहाटे ६ पासून मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सायंकाळी होणा-या दत्तजन्म सोहळ्याला भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. शासन नियमांनुसार केवळ ट्रस्टच्या विश्वस्तांच्या व मोजक्या सेवेक-यांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा पार पडेल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी दिली.


सोमवारी सकाळी मंदिरात विद्या अंबर्डेकर यांसह २१ महिलांनी रुद्रपठण केले. ट्रस्टचे अध्यक्ष  अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते लघुरुद्र पार पडला. यावेळी कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते. 


दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ६ वाजून ०५ मिनीटांनी दत्तजन्म सोहळा पार पडेल. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भव्य एलईडी ची व्यवस्था करण्यात येणार असून तेथे भाविकांना सोशल डिन्स्टसिंग पाळून हा सोहळा पाहता येईल. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे – https://www.facebook.com/107521001159281 या  फेसबुक पेजवरुन भाविकांना दत्तजन्म सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. 
मंगळवारी सकाळी ६.३० वाजता ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष व वंदना मोहिते यांच्या हस्ते लघुरुद्र होणार आहे. तसेच, विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांसह लीना लोंढे आणि समीर व अस्मिता भुजबळ यांच्या हस्ते अनुक्रमे सकाळी ८ व दुपारी २ वाजता दत्तयाग होईल. दुपारी १२.३० वाजता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते माध्यान्ह आरती होणार आहे. दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२३ वे वर्ष असून यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading