Friday, September 4, 2026
PUNE

‘रिपाइं’तर्फे आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना खाऊ, धान्य वाटप

पुणे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा युवक आघाडीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना खाऊ व धान्य वाटप करण्यात आले. मुळाशी तालुक्यातील भाजपाचे नेते राजेंद्र बांदल यांच्या हस्ते केक कापून बाळमेळावा साजरा झाला. बावधन-भुगाव येथे अनिकेत सेवाभावी संस्था संचलित ॐ श्री साई ॐ मतिमंद मुलांचे पुनर्वसन प्रकल्पातील मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये अन्नदान व खाऊ वाटप झाले.
‘रिपाइं’च्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश कांबळे, कार्याध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. श्रीकांत कदम, सतीश केदारी, हरीश देखणे, गोविंदभाई निकाळजे, राहुल कांबळे, विजय भोसले, मंदाताई जाधव, विजय दगडे, आनंद कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading