Thursday, September 3, 2026
PUNE

आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त ‘रिपाइं’तर्फे विविध उपक्रम

आरोग्य शिबिर, पीपीई कीट, धान्य-फळे, केक वाटपासह सदस्यता नोंदणी अभियान व नवीन शाखांचे उद्घाटन

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर कार्यालयात पाच किलोचा केक कापून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला. शहर कार्यकारिणीच्या वतीने आठवले यांच्यावर शुभेच्छा वर्षाव झाला. केक वाटप व स्नेहभोजन करून ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘रिपाइं’चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनावणे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, निलेश आल्हाट आदी उपस्थित होते.
पीपीई किटचे वाटपवडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात येरवडा येथे राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये पीपीई किटचे वाटप करण्यात आले. डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, महिपाल वाघमारे, वडगाव शेरी कार्याध्यक्ष विजय कांबळे व प्रभाग दोन शाखा प्रमुख शशी पंडित उपस्थित होते. सदस्यता नोंदणी अभियानात १२५० कार्यकर्त्यांनी नोंद केली.
रक्तदान शिबीर’रिपाइं’च्या हडपसर विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच सिद्धार्थनगर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन झाले. प्रसंगी नगरसेविका हिमाली कांबळे, शशिकला वाघमारे, संतोष खरात, मीनाताई गालटे, राजू कांबळे, भाई जगताप, माधव दंदी आदी उपस्थित होते.
लाडू, केक वाटप’रिपाइं’च्या पर्वती मतदारसंघातील प्रेमनगर भागात लाडू व केकचे वाटप करून आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बसवराज गायकवाड, सुगध धसाडे, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोथरूड मतदारसंघातही केक वाटप करून वाढदिवस साजरा झाला. जितेश दामोदरे, उज्ज्वला सर्वगौड, सुशील सर्वगौड, बाळासाहेब खंकाळ आदी उपस्थित होते.
दिव्यांगांना धान्यवाटपखडकवासला मतदारसंघातील ज्ञानगंगोत्री मतिमंद निवासी शाळेत धान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. राहुल कांबळे, शरणु गायचोडे, गौतम कांबळे, राजाभाऊ सावंत उपस्थित होते. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बोपोडीत नगरसेविका सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर यांच्या पुढाकारातून ख्रिश्चन कुटुंबियांना केक वाटप करून व बाळमेळावा करून आठवले यांचा वाढदिवस साजरा केला.
आरोग्य शिबीर, व्याख्यानकसबा मतदारसंघातील लोहियानगर येथे आरोग्य शिबीर आयोजिले होते. डॉ. कपिल जगताप, मोहन जगताप, बाळासाहेब जगताप, डॉ. शिंदे उपस्थित होते. यासह ‘रिपाइं’च्या विविध शाखांचे उद्घाटन व सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच रोहिदास गायकवाड यांचे व्याख्यान झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading