Tuesday, June 16, 2026
PUNESports

अश्वारोहणातील प्रथम अर्जुन अ‍ॅवॉर्ड विजेते सुभेदार अजय सावंत यांचा सन्मान

पुणे : अश्वारोहण क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रथम अर्जुन अवॉर्ड विजेते सुभेदार अजय सावंत यांचा महाराष्ट्र इक्वेस्ट्रीअन असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. 


यावेळी महाराष्ट्र इक्वेस्ट्रीअन असोसिएशनचे सचिव गुणेश पुरंदरे, खजिनदार विनायक हळबे, सुभेदार चंद्रकांत शेडगे उपस्थित होते.
गुणेश पुरंदरे म्हणाले,सन २०१६ मध्ये इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड कप ट्वेन्टी किंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. तसेच २०१८ साली आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्ड कप ट्वेन्टी किंग कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी रौप्यपदक मिळवले होते. अश्वारोहणाच्या शो जम्पिंग ड्रसाज,  क्रॉस कंट्री इत्यादी क्रीडा प्रकारात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर वर उल्लेखनीय कार्य केले आहे. याबद्दल भारत सरकारने यावर्षी त्यांना अर्जुन अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित केले. यानिमित्ताने सुभेदार अजय सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading