अभिनेत्री भूमी पेडणेकरने सांगितले वाव स्किनकेअर लाईन ची ब्रँड अँबॅसिडर होण्याचे कारण
पुणे, दि. १० – मेक-इन-इंडिया स्किनकेअर आणि वेलनेस ब्रँड वावस्किन सायन्स तर्फे आज एक लघु ब्रँड व्हिडिओ-फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या व्हिडिओ फिल्ममध्ये भूमी पेडणेकर असून तिने नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेचा विश्वास कसा संपादन केला याचे रहस्य या फिल्ममध्ये सांगितले आहे. निसर्ग प्रेरित सौंदर्य हे वाव स्किन सायन्सचे वैचारिक अधिष्ठान आहे. भूमी पेडणेकर ही सुद्धा या मूल्य संस्थेशी सहमत असल्यामुळे तिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यात आले.
आपल्या त्वचेचं निसर्गाशी असलेले एकेकाळचे नाते आपण आपल्या व्यग्र दिनक्रमामुळे विसरून गेलो आहोत हे या फिल्ममध्ये ब्रँडने दाखविले आहे. आपण जसे आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांबरोबर नाते जोपासतो तेवढेच महत्त्व आपल्या त्वचेच्या आणि निसर्गातील नात्याला दिले गेले पाहिजे. आपल्या अवतीभोवती प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे. आपण फक्त त्याला पुनर्जिवित करून ते नाते पुन्हा सजीव करण्याची गरज आहे.
बाॅलीवूड स्टार आणि क्लायमेट वाॅरियर भूमी पेडणेकर म्हणाली, माझा विश्वास फक्त निसर्गावर आहे आणि माझ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त निसर्गावरच मी विश्वास ठेवू शकते. त्यामुळेच वाव स्किन सायन्सला माझी पसंती आहे. क्लायमेट वाॅरियर बनल्यापासून मी पुन्हा निसर्गाच्या जवळ गेली आहे. मी आतापर्यंत काय गमावले याची जाणीव मला निसर्गाजवळ गेल्यामुळे झाली आहे. आपल्या आहाराच्या सवयींपासून ते त्वचेच्या निगराणीपर्यंत सर्वच गोष्टींसाठी आणि निसर्गाच्या जवळ गेलो पाहिजे. तुमच्यापर्यंत नैसर्गिक उत्पादने आणून वाव स्किन सायन्स हे काम करत आहे. त्यामुळे मी विश्वासाने म्हणू शकते की वाव ब्रँडवर विश्वास म्हणजे निसर्गावर विश्वास.
मधुरआचार्य म्हणाले, परिणामकारक सौंदर्य प्रसाधनांबद्दल ग्राहकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही शाश्वत आणि नैसर्गिक सौंदर्यावर भर देतो. आपल्या त्वचेच्या निगराणीसंदर्भात ग्राहकांना पुन्हा एकदा निसर्गाशी जोडण्याचे काम या फिल्मद्वारे करण्यात आले आहे. नैसर्गिक पद्धतींवर विश्वास असलेली भूमी पेडणेकर या उपक्रमाद्वारे आमच्या सोबत आली आहे. त्यामुळे सर्वांपर्यंत पोचून हा महत्त्वाचा संदेश देणे आमच्यासाठी सोपे झाले आहे.
