Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENT

टाटा स्काय  वर  मनोहर कहानियां

मनोहर कहानियां ही मानवी जीवनातील घटनांच्या प्रेरणेतून सादर होणारी टाटा स्काय अद्भूत कहानियांवरील सीरिज आहे. शेमारू एंटरटेनमेंट लि.चा सहभाग असलेली ही सीरिज मनोहर कहानियां या ख्यातनाम नियतकालिकामधील कथांवर आधारित आहे. सत्य घटनांमधून प्रेरित या कार्यक्रमात तीन मुख्य प्रकारांवर भर देण्यात आला आहे : थ्रिलर, हॉरर आणि गुन्हेगारी. आगामी भागात सोनिया नावाच्या सेलिब्रिटी व्यक्तीच्या आयुष्यावरील कथा मांडण्यात येणार आहे. बड्या कलावंतांची मांदियाळी असलेल्या या भागात मोनिका खन्ना या अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे तर नील मोटवानी तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. शिवाय, अजय चौधरी आणि मनोज चंडिला हे वकिलांच्या भूमिकेत दिसतील.

ही कथा आहे सोनिया मुखर्जी (मोनिका खन्ना) या प्रसिद्ध सिनेस्टारची. अत्यंत देखणी, खंबीर अशी ही अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला फार महत्त्व देते. ती मिहिर (नील मोटवानी) या बड्या उद्योजकाच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. मात्र, लग्नाच्या वाढदिवसालाच सोनियाच्या हातून मिहिरला गोळी लागते आणि प्रेमकथेला एक वेगळं वळण मिळतं. पोलिस सोनियाला या मृत्यूसाठी अटक करतात मात्र आपण निर्दोष असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिच्या एका सहकलाकाराशिवाय अन्य कोणाचाही तिच्यावर विश्वास नाही. हा सहकलाकार प्रशांत (अजय चौधरी)ला तिची वकिली करण्याची विनंती करतो. तो न्यायाला प्राधान्य देणारा सूज्ञ माणूस आहे. मात्र, तो सोनियाला भेटतो तेव्हा त्यालाही तिच्या हेतूविषयी शंका येते. सोनियाच अपराधी आहे की तीही बळी पडतेय?

या अभिनेत्रीची भूमिका साकारणारी मोनिका खन्ना म्हणाली, माझ्यात आणि सोनियामध्ये बरंच साम्य आहे. अभिनेत्री बनणं सोपं नाही. आम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं ठेवावं लागतं आणि हे असंच नीट सुरू राहील, याकडेही लक्ष द्यावं लागतं.

आपल्या व्यक्तिरेखेविषयी अभिनेता अजय चौधरी म्हणाला, खऱ्या वाटतील अशा भूमिका साकारणं मला आवडतं. या शोमधील प्रशांत या माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणेच मी मुद्द्याचं बोलणारा माणूस आहे. माझे मित्र तर मला नेहमी म्हणतात, मी अभिनेता नसतो तर वकिलच असतो. या शोमध्ये खऱ्याचा अंश आहे, या शोमुळे मी त्या सत्याच्या दिशेने जाऊ शकलो. याच कारणामुळे मी यात काम केलं.

मनोहर कहानियांचा हा भाग पहा टाटा स्काय अद्भूत कहानियांवर १४४  क्र.वर. ही सेवा व्हिडीओ नॉन डिमांड (व्हीओडी) अंतर्गत टाटा स्काय मोबाइल अॅपवरही उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading