युटीआय म्युच्युअल फंडातर्फे ‘युटिआय स्मॉल कॅप फंड’ लाँच
युटिआय म्युच्युअल फंडातर्फे ‘युटिआय स्मॉल कॅप फंड’ ही नवी ओपन- एंडेड इक्विटी योजना लाँच करण्यात आली आहे, जी प्रामुख्याने लघु भांडवल असलेल्या शेयर्समधे गुंतवणूक करेल. या फंडाची योजना 2 डिसेंबर 2020 रोजी सुरू होणार असून 16 डिसेंबर 2020 रोजी बंद होईल. ही योजना सबस्क्रिप्शन आणि रिडम्प्शनसाठी सातत्यपूर्ण पद्धतीने 23 डिसेंबर 2020 पासून परत सुरू होणार आहे.
लघु भांडवल असलेल्या कंपन्यांची इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमधे प्रामुख्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वृद्धी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मात्र, या योजनेची गुंतवणुकीशी संबंधित उद्दिष्टे साध्य होतील याची खात्री देता येणार नाही.
श्री. अंकित अगरवाल हे या योजनेचे फंड व्यवस्थापक आहेत.
श्री. अंकित म्हणाले, ‘छोट्या व्यवसायांना कायमच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते. उत्पादन, रिटेलिंग, सेवा, बांधकाम अशा प्रमुख क्षेत्रांत त्यांचे अस्तित्व लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत लघु व्यवसायांचा विकास करण्यासाठी सरकारने विविध प्रकारचे उपक्रम आणि संधी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळात लहान कंपन्यांचा आर्थिक विकासातील वाटा विस्तारण्याची शक्यता आहे.’
‘व्यापक व्यवसाय प्रारूप असलेल्या, अनुभवी व्यवस्थापनाद्वारे हाताळल्या जाणाऱ्या आणि गुंतवलेल्या भांडवलाच्या आधारे उच्च परतावा मिळवणाऱ्या कंपन्यांमधे गुंतवणूक करण्याचा युटीआय स्मॉल कॅप फंडाचा प्रयत्न असेल. यामधे असलेली जोखीम हाताळण्यासाठी आमच्याकडे 360 डिग्री जोखीम विश्लेषण फ्रेमवर्क असून त्याच्या मदतीने लघु भांडवली कंपन्यांकडून नफा मिळवला जाईल तसेच विकासाच्या संधी असलेल्या मध्यम भांडवली कंपन्यांची निवड केली जाईल,’असेही ते म्हणाले.
