Sunday, May 31, 2026
ENTERTAINMENT

शब्बीर आहलुवालियाने दाखवली आपली खेळ कौशल्ये

असमांतर कॉन्टेन्ट, संस्मरणीय कथा आणि आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखांसह झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ह्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण हिस्सा बनल्या असून त्यांनी इथे भावनांचा हलकल्लोळ अनुभवला आहे. आता वर्षाचा तो काळ आला आहे जेव्हा झी टीव्ही अनेक अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, क्रिएटिव्ह टीम्स, तंत्रज्ञांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करते. हे सर्व लोक अथक मेहनत करून प्रेक्षकांसाठी त्यांचे आवडते दैनंदिन प्राईमटाईम शोज्‌ ‘झी रिश्ते अॅवॉर्ड्‌स’च्या सेलिब्रेशनसोबत करतात. ह्यावर्षी हे वार्षिक अॅवॉर्ड्‌स झी टीव्ही कुटुंबाचे सेलिब्रेशन अतिशय धूमधडाक्यात करणार आहेत. ह्यावर्षी महामारीच्या संकटामुळे फेस्टिव्हिटी आणि सेलिब्रेशन छोट्‌या प्रमाणावर असले तरी झी टीव्ही प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम मनोरंजन आणणार आहेत जिथे ‘इंडिया एक रात में पूरा साल मनायेगा’. झी की खुशियों की चाबी सोबत आनंदाला अनलॉक करण्यासाठी वाहिनी तुमच्यासाठी ‘इव्हेंट ऑफ दि यर’ घेऊन येत आहे,

प्रेक्षकांना त्यांचे सगळे आवडते सितारे एका छताखाली पाहायला मिळतील. कलाकारांनी हल्लीच झी रिश्ते अॅवॉर्ड्‌सच्या नॉमिनेशन स्पेशल एपिसोडसाठी चित्रीकरण केले. यात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखांची वेगळी बाजू पाहायला मिळेल. आपला सर्वांचा आवडता शब्बीर ऊर्फ कुमकुम भाग्यमधील अभि हा एक उत्तम फूटबॉल खेळाडू असून तो ‘ऑल स्टार फूटबॉल क्लबचा हिस्साही राहिलेला आहे, जिथे अनेक सेलेब्रिटीज्‌ सामाजिक कारणांसाठी खेळतात. नॉमिनेशन स्पेशल एपिसोडमध्ये शब्बीरची ओळख करून देताना सूत्रधारासोबत बोलताना त्याने क्रिकेट आणि फूटबॉलमधील आपले कौशल्य दाखवले. त्याच्या मूव्ह्‌स सर्वांना निश्चित आवडतील. एवढेच नाही तर शब्बीरच्या पावलांवर पाऊल ठेऊन कृष्णा कौल रणबीर, फहमान खान वीर यांनीही फूटबॉल शब्बीरच्या पद्धतीने खेळून पाहिला आणि शेवटच्या भागात शब्बीर, कृष्णा कौल, सेहबान अझिम मल्हार, फहमान खान आणि सूत्रधार प्रितम सिंग हे गली क्रिकेट खेळताना दिसले. झी रिश्ते अॅवॉर्ड्‌सच्या नॉमिनेशन स्पेशल एपिसोडमध्ये शब्बीर सायकलिंग करतानाही दिसून आला.

हे नक्कीच नाविन्यपूर्ण आणि पाहण्यासाठी मनोरंजक आहे.

पहा नॉमिनेशन्स स्पेशल एपिसोडची मस्ती झी टीव्हीवर शनिवार १२ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजता आणि झी रिश्ते अॅवॉर्ड्‌स २७ डिसेंबर रोजी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading