Saturday, May 30, 2026
PUNE

अट्रोसिटीच्या कडक अंमलबजावणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चा चे आंदोलन

पुणे, दि. 4 – दलित अत्याचार प्रतिबंधित कायद्याची (अट्रोसिटी ) कडक अमंलबजावणी पोलीस आणि प्रशासनाकडून व्हावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्च्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अट्रोसिटी ऍक्ट कायद्याचे वाचन करून अभिनव पध्द्तीने आंदोलन करण्यात आले व पोलीस ,प्रशासन आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला .यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.


या आंदोलनाचे नेतृत्त्व रिपब्लिकन युवा मोर्च्यांचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले .या वेळी बोलताना डंबाळे म्हणाले की , दलित पीडितांना न्याय देण्यासाठी हा कायदा आहे परंतु या कायद्याचा वापर प्रभावी पोलीस प्रशासन करीत नाही त्यामुळे त्यांना या कायद्याचा अभ्यास व्हावा व त्यांनी करावा म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचे सांगितले .या वेळी संविधानातील अट्रोसिटी कायद्यातिल कलमाचे सामूहिक वाचन करण्यात आले .
या आंदोलनात राहुल डंबाळे,दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण ,भीम छावा चे अध्यक्ष श्याम गायकवाड ,कष्टकरी पंचायतीची नेते बाबासाहेब कांबळे, भीम आर्मी चे अभिजीत गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या स्नेहल कांबळे, अजय लोंढे, रिपब्लिकन पक्षाचे किरण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोसले,
,अश्विन दोडके यासह पुणे शहरातील महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading