Sunday, May 31, 2026
TECHNOLOGY

‘नोकिया’ लवकरच लाँच करणार लॅपटॉप

फिनलँडची स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया लवकरच भारतात आपला लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. एचएमडी ग्लोबलने स्मार्टफोन, फीचर फोन आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीजसाठी नोकिया कंपनीला परवाना दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार…

नोकिया लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS च्या वेबसाईटवर पाहण्यात आला आहे. कंपनी लवकरच आपला लॅपटॉप बाजारात आणण्याची शक्यता आहे.

बीआयएस लिस्टिंगनुसार, नोकियाचे लॅपटॉप चीनमध्ये टोंगफँग लिमिटेड निर्मित केले गेले आहेत. कंपनी ब्रँडअंतर्गत 9 लॅपटॉप भारतात लाँच करू शकते.

नोकियाचे सर्व लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसह, Intel Core i3 आणि Core i5 प्रोसेसरसह लाँच केले जाणार आहेत.

नोकिया लॅपटॉपच्या किंमतीबाबत आणि स्टोरेज कॅपेसिटीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

नोकियाच्या इतर प्रोडक्ट्स स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग बॉक्सप्रमाणे हे लॅपटॉपही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तरी कंपनीकडून लॅपटॉपबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading