fbpx
Saturday, April 27, 2024
PUNETOP NEWS

पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

पुणे, दि. 4 – पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.

अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरले, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते.

जनतेने दाखवलेला विश्वास, त्याचा मतात झालेल रूपांतर, जनतेने भरभरून दिलेल प्रेम, यामुळे माझा विजय साकार झाला आहे. आपण सर्वानी दिलेल्या प्रेमामुळे मी आज हि निवडणूक जिंकू शकलो. मी सदैव आपला आभारी राहीन अशी प्रतिक्रिया विजयानंतर लाड यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading