राज्याच्या छोट्या शहरातील होतकरू नव – उद्योजकांना मदतीचा हात

सेल्स आणि मार्केटिंग अर्थात विक्री आणि विपणन विषयक उद्योजक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन
पुण्यातील व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. अभय करडेगुड्डी आणि वनप्लस चा पुढाकार

पुणे, दि. 2 – कोणताही नवा व्यवसाय सुरू केल्यानंतर सेल्स आणि मार्केटिंग अर्थात विक्री, विपणन क्षेत्रात येणा-या अडचणींवर योग्य रित्या मात न करता आल्याचा फटका अनेक छोट्या उद्योजकांना बसतो.  नेमकी हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्राच्या लहान शहरातील विद्यार्थी व नवोदित उद्योजकांना आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी पुण्यातील व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा. अभय करडेगुड्डी यांनी वनप्लस या मोबाईल उत्पादक संस्थेच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे.

या अंतर्गत नवोदित उद्योजकांसाठी विक्री आणि विपणन विषयक उद्योजक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नीवा युवा उद्योजक प्रशिक्षण उपक्रम असे या उपक्रमाचे नाव असून निवड झालेल्या 8 उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. आठवड्यातील ४ ते ५ तास ऑनलाईन तर अधिकचे ६ ते ८ तास प्रत्यक्ष प्रशिक्षण या पद्धतीने तीन महिन्यात सदर प्रशिक्षण पार पडेल.        

याविषयी अधिक माहिती देताना प्रा. अभय करडेगुड्डी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी लहान शहरातील नवोदित व्यवसायिकांना व्यवसाय करीत असताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यावर संशोधन करीत असताना या सर्वांना मुख्यत: विपणन व विक्री याविषयी फारशी कल्पना नसते, असे लक्षात आले. यशस्वी उद्योजक होण्याची क्षमता असूनही केवळ या विषयातील माहिती नसल्याने यांना व्यवसायात अपेक्षित यश मिळत नाही याकडे या दरम्यान लक्ष वेधले गेले. म्हणूनच राज्यातील लहान शहरातील (टियर २, टियर ३ शहरे) युवकांना प्रशिक्षित करावे या हेतूने आम्ही नीवा युवा उद्योजक प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. व्यवसाय यशस्वीरित्या उभारण्यासाठी आवश्यक असलेले विक्री व विपणन विषयाचे प्रशिक्षण याद्वारे आम्ही नव उद्योजकांना देणार आहोत.”  

सदर प्रशिक्षणामध्ये विपणन व उद्योजकता, स्टार्ट अपसाठी आवश्यक स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, मार्केटमध्ये पदार्पण करीत असताना आवश्यक मार्केटिंग प्लॅन, विक्रीसाठी आवश्यक व्यवसायिक दृष्टीकोन, नव्या  व्यवसायासाठी आवश्यक वितरण व्यवस्था, डिजिटल मार्केटिंग आदी आवश्यक बाबीं संदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल. ऑनलाईन प्रशिक्षणाबरोबरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आठवड्याला ६ ते ८ तास प्रत्यक्ष प्रशिक्षण याद्वारे कौटुंबिक व्यवसाय, भागीदारी व्यवसाय अथवा स्वत:चे स्टार्ट अप यासंदर्भात मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना करण्यात येईल. सहभागी विद्यार्थी व नव उद्योजकांना वेळोवेळी तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील उपलब्ध होऊ शकेल, असेही करडेगुड्डी यांनी              

प्रा. अभय करडेगुड्डी हे व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ असून त्यांना या क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे हे विशेष. वय वर्ष १८ ते २५ या वयोगटातील १२ वी उत्तीर्ण, पदव्युत्तर पदवीधर अथवा स्वत:चा स्टार्ट अप असलेल्या कोणालाही या प्रशिक्षण उपक्रमासाठी अर्ज करता येणार आहे. दि. १५ डिसेंबर २०२० ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून सर्व अर्जदारांची प्रथम एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल त्यातून निवड झालेल्या अर्जदारांच्या मुलाखती स्वत: तज्ज्ञ घेतील. यातून निवडक ८ जणांना या प्रशिक्षण उपक्रमात मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या शेवटी या सर्वांना प्रमाणपत्रे देखील प्रदान करण्यात येतील.

इच्छुकांनी https://forms.gle/eogeukxq5FX5TsYB7 येथे अर्ज नोंदणी करावी. अथवा www.nivagrowth.com या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन या वेळी प्रा. अभय करडेगुड्डी यांनी केले.  

Leave a Reply

%d bloggers like this: