‘राईट टू पोल्यूशन फ्री एन्व्हायर्नमेंट’ या विषयावर वेबिनारचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अॅकॅडमीच्या वतीने
‘ राईट टू पोल्यूशन फ्री एन्व्हायर्नमेंट -ज्युडीशियल ट्रेंडस् ‘ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हा वेबिनार होईल. युनायटेड नेशन्स असोसिएशन ( गुजरात ) च्या महासचिव डॉ. मयुरी पंडया प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार असणार आहेत. डॉ. विजय ओक, प्रा. मुझफ्फर शेख , डॉ. रशीद शेख हे सहभागी होणार आहेत. संयोजक डॉ. सलीम शेख, डॉ.मोरेश्वर कोठावदे , डॉ. स्वाती शिंगटे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
