Sunday, May 31, 2026
PUNE

भारती विद्यापीठ ‘ आयएमईडी ‘ च्या नव्या शैक्षणिक वर्षात  माजी विद्यार्थ्यांचा ‘सहयोग’ !

पुणे, दि. 1 – भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( ‘ आयएमईडी ‘ )च्या नवीन शैक्षणिक वर्षात माजी विद्यार्थ्यांच्या दोन मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून विविध वेबिनार आणि चर्चासत्रातून माजी विद्यार्थ्यांचा चांगला ‘सहयोग’ मिळत आहे.आयएमईडीचे संचालक आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
‘सहयोग २०२०’ या नावाने माजी विद्यार्थ्यांचे दोन मेळावे अलीकडेच घेण्यात आले. पहिल्या मेळाव्यात टीसीएस चे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भन्साळी,एमडॉक्सचे रिजनल फॅसिलिटीज मॅनेजर सुजित एदलाबादकर,एमएसएम लॉजिस्टिक्सचे मार्केटिंग हेड मनोरंजन गामी या माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. 
ऑनलाईन पध्दतीने झालेल्या दुसऱ्या  मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि शाओमी टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग मॅनेजर  आशीष सिंग,सिप्ला इंडिया चे सिनियर ब्रँड मॅनेजर सुधांशू बेहरा यांनी मार्गदर्शन केले.
 ‘ सहयोग २०२०  या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या शृंखलेस चांगला प्रतिसाद मिळत असून नव्या शैक्षणिक विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे.नोकरी मिळण्याच्या अनुभवापासून कामाचे अनुभव ऐकायला मिळत आहेत. 
सुधांशू बेहरा म्हणाले, ‘ मार्केटिंग क्षेत्रात एम.बी.ए. झाल्यावर कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. ही नोकरी वारंवार बदलण्याकडे अनेकांचा कल असतो. नोकरी बदलली तरी चालेल पण, निवडलेले क्षेत्र बदलू नका. ‘
आशीष सिंग म्हणाले, ‘ व्यवस्थापनशास्त्र शिकणाऱ्या आणि करीयर करणाऱ्या प्रत्येकाने सोशल मीडिया साईटवर कार्यरत राहिले पाहिजे. व्यक्त होत राहिले पाहिजे.ज्या राज्यात आपण काम करतो, त्या राज्यातील भाषा आपल्याला आली पाहिजे.
संयोजन समितीच्या डॉ सोनाली खुर्जेकर,प्रा डॉ भारती जाधव,प्रा.दीपक नवलगुंद या सदस्यांनी स्वागत केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading