Tuesday, June 16, 2026
PUNE

या वर्षी नेव्ही डे व्हर्च्युअल – आएएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस म्हैसूरच्या टूरचे वेळापत्रक भारतीय नौदलाकडून जारी

पुणे, दि. १ – १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारतीय नौदलाच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी ४ डिसेंबर हा नौदल दिवस (नेव्ही डे)म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी भारतीय नौदलाच्या विविध सामूहिक संपर्क कार्यक्रमांद्वारे नागरिकांची जनजागृती करण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी, आपली प्रतिमा उंचविण्यासाठी तसेच नेव्हीला करिअरच्या दृष्टीकोनातून पर्याय म्हणून प्रक्षेपित करण्यासाठी हे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी नौदल मुख्यालयाकडून नेव्ही विकच्या अनेक योजना आखल्या जातात . या वर्षीची प्रख्यात थीम आहे ‘इंडियन नेव्ही – कॉम्बॅट रेडी, क्रेडीबल एण्ड कोचसिव्ह ’. तथापि, यावर्षी कोवीड-१९मुळे घातल्या गेलेल्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअल स्वरुपाचा असेल. सोशल डिस्टंन्सिंगशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी काही उपक्रम राबवले जात आहेतः
आयएनएस विक्रमादित्यची ३६० ° व्हर्च्युअल रिअल्टी टूर-आयएनएस विक्रमादित्यच्या वरच्या डेकचा एक छोटा ३६० व्हर्च्युअल रियलिटी (व्हीआर) टूर व्हिडीओ हा भारतीय नौदलातील विमान वाहक सेवेचा असेल, जो दर्शकांना पाहण्यासाठी तयार आहे. दर्शक आपला स्मार्ट फोन / इतर डिव्हाइसेस वापरुन फ्लाइट डेक आणि अन्य अवर्गीकृत क्षेत्र 360 अंशतुन व्हिडीओ द्वारे पाहु शकतात .
व्हर्च्युअल शिप ‘आयएनएस म्हैसूर-अ वॉक अराऊंड दर्शकांसाठी खुले-दरवर्षी नेव्ही डेला नेव्हीची जहाजे सार्वजनिक दर्शनासाठी खुली ठेवली जातात. यावर्षी नौदलातील विनाशक आयएनएस म्हैसूर ही दर्शकांसाठी वर्च्युअली उपलब्ध आहे. दर्शकांना जहाजातील कर्मचार्‍यांकडून संबंधित ब्रीफिंगसह जहाजाच्या प्रमुख ठिकाणांच्या आभासी प्रवासाचा अनुभव प्रदान केला जाईल.शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखती-शौर्य पुरस्कार विजेते आणि भारतीय नौदलाच्या इतर तज्ञांच्या रेडिओ मुलाखती ऐकण्याची संधी एफएम चॅनेल्सद्वारे खाली दिलेल्या तपशीलांनुसार संभाषणे प्रसारित केली जात आहेत: –
(i) 0४ डिसेंबर २०२० रोजी रेडिओ मिर्ची.(iii) एआयआर एफएम वर १ ते ४ डिसेंबर २०२० रोजी प्रसारण होईल.
बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह नेव्ही डे स्पेशल फिल्म- नेव्ही डेवरील विशेष चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती ३ डिसेंबर रोजी दूरदर्शन तर्फे प्रसारित केली जाईल आणि प्रादेशिक वाहिनीवर चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रसारित केला जाईल. यात फ्लॅग ऑफिसर कमांडिंग – इन चिफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांचा संदेश असेल. नेव्हल ऑपरेशन्सची झलक आणि बँड सादरीकरणे दर्शविणारा हा माहितीपट प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल.
१९७१ नेव्हल अॅक्टिंग शॉर्ट फिल्म- दॅट ग्लोरियस नाईट ठराविक सिनेमागृहांमध्ये- नेव्ही डेवरील एक लघुपट ४आणि ५ डिसेंबर २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. ‘नेव्ही एज ए वे ऑफ लाईफ’ वर एक खास वेबिनार- ‘इंडियन नेव्ही – ए वे ऑफ लाइफ’ हे वेबिनार २८ नोव्हेंबर २०२० रोजी ११.०० ते १३.३० वाजता नियोजित करण्यात आले होते. भारतीय नौदलाच्या विविध शाखांमधील अधिकार्यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले आणि प्रेक्षकांशी संवाद साधला.

यासाठी खाली दिलेल्या लिंक पाहता येतील-

www.indiannavy.nic.in/content/wnc-navy-week-2020 

www.youtube.com/watch?v=msPnEnCqdH8&feature=youtu.be

https://m.facebook.com/IndianNavy/  –

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading