नर्मदेचा संग ..माझा भावरंग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न
पुणे, दि. 1 – नर्मदा परिक्रमावर आधारित नर्मदेचा संग … माझा भावरंग या श्रीनिवास कुलकर्णी लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुणे महापालिकेचे क्रीडा समिती अध्यक्ष ,नगरसेवक विरसेन जगताप यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
भारतात नर्मदा परिक्रमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते .लाखो लोकांचे नर्मदा श्रद्धा स्थान समजले जाते .या नर्मदा परिक्रमाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आणि वर्णन सांगणारे हे पुस्तक आहे.
नगरसेवक विरसेन जगताप आपल्या मनोगतात म्हणाले की , हे पुस्तक अतिशय उपयोगी असून कुलकर्णी यांची भाषा शैली खुपचं भावणारी वाटली. या पुस्तकाने महाराष्ट्रातील भाविक आणि पर्यटकांना अतिशय सुंदर अशी अनुभूती मिळणार असल्याचे सांगितले.तसेच अशी पुस्तके सद्याच्या पिढीला अतिशय गरजेची असल्याची भावना व्यक्त केली.
श्रीनिवास कुलकर्णीं यांनी आपल्या मनोगतात नर्मदा परिक्रमा विषयी अनेक आठवणी सांगितल्या .या पुस्तक लिहण्यामागे सर्वाना या परिक्रमा चे अनुभव वाचनातून मिळावे तसेच नव्या पिढीला यातून आपली संस्कृती आणि ऐतिहासिक महत्त्व समजावे ही भावना
असल्याचे म्हटले .
या समारंभास अर्थतज्ञ प्रकाश पाटील , डॉ.विजय सावरगावकर , प्रताप पाटील , राजश्री कुलकर्णी ,संपत गोळे , विनायक देशपांडे , अशोक दूधानी, महेंद्र शहा , संजय जगदाळे , अजय जगताप यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
