Thursday, September 3, 2026
PUNE

केअर टेकर्स सोसायटीतर्फे सिरम इन्स्टिट्यूटला सलाम

पुणे : केअर टेकर्स सोसायटीतर्फे चला एका वेगळ्या सुदृढ युगाचे साक्षीदार होऊ  या   अभिनव उपक्रमांतर्गत कोरोनावरील लस शोधणाºया सीरम इन्स्टिट्यूटला सलाम करण्यात आला. पुणेकरांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रति कौतुकाची पोस्ट टाकून त्यांचे आभार मानू तसेच आपल्या घरावर भारताचा झेंडा उभारुन त्यांच्या कार्याला सलाम करण्याचे आवाहन देखील संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
समस्त पुणेकरांना  या आनंदोत्सवात सामील होण्याचे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत यादव, रणजित परदेशी, संजय असरकर, इरफान मुल्ला, विजय बेलिटकर, शाशिधर पुरम, पवन देडगावकर, अध्यक्ष कुमार शिंदे यांच्या तर्फे करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याशेजारी संस्थेच्या वतीने सिरम इन्स्टिट्यूटला अभिवादन करण्यात आले.  
कुमार शिंदे म्हणाले, देशात महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण मिळाला, त्याच राज्यात कोरोनाची लस सिरम इंस्टिट्यूट मार्फत बनविण्यात येत आहे. पुण्यातूनच कोरोनाला हद्दपार  करण्याची सुरूवात होणार आहे ही, आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यासाठीच पुणेकरांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या कौतुकसोहळ््यात सामील व्हावे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading