Saturday, September 5, 2026
PUNE

संविधान वाचन कार्यक्रम वर्षभर झाले पाहिजे – आमदार सुनील कांबळे

पुणे – संविधान हे उपेक्षित ,सर्वसामान्य माणसाला अतिशय मोलाचे आहे.त्याचे वाचन आणि अभ्यास आज समाजाला अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे .त्यामुळे केवळ संविधान दिवसापूरता वाचन कार्यक्रम न ठेवता तो वर्षभर केला पाहीजे असे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.ते 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे शहर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने संविधान वाचन व 26/11 शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्याचा एकत्रित कार्यक्रम फुले वाड्यावर पार पडला त्यावेळी बोलत होते.


या कार्यक्रम प्रसंगी उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे यांनी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी नगरसेविका आरती ताई कोंढरे यांनी। आपले विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहराध्यक्ष भीमराव साठे यांनी केले होते .त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संविधान दिनाचे महत्त्व सांगितले आणि 26/11 शहीद हुतात्मा आदरांजली सभा आयोजन करण्याची भूमिका सांगितली.
आमदार सुनीलभाऊ कांबळे,उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,शहराध्यक्ष भीमराव साठे,
नगरसेविका आरतीताई कोंढरे,नगरसेविका वर्षा साठे ,कसबा मतदार संघ भाजपाध्यक्ष प्रमोदजी कोंढरे,भाजपा नेते तुषार पाटील,अनु जाती आघाडी सरचिटणीस महाराष्ट्र सुखदेवजी आडगळे,संगीताताई चौरे , आतुलजी साळवे.कसबा सरचिटणीस .छगन बुलाखे,किरण चौधरी,.बंडू चरण,आझादभाई शेख,सुनीलभाई खंडागळे, संदीप सांगळे,.श्रीराम कांबळे,रवी खैरे,.बाबासाहेब हंकारे,सौ.मालती उघडे,श्रीमती उषाताई गडदे.आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमराव साठे
शहराध्यक्ष भाजपा अनु.जा मोर्चा पुणे शहर यांनी केले व आभार प्रदर्शन .अँड.महेशजी सकट यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading