Tuesday, June 16, 2026
Business

महाराष्ट्रात डिझेल हव्या त्या जागी पोचवण्यासाठी हमसफरची ओकारा लॉजिस्टिक्स बरोबर भागीदारी

पुणे, दि. 25 – अचल किंवा अति अवजड खोदाई यंत्रसामुग्रीसाठी  आवश्यक त्या जागी ऍप च्या साह्याने डिझेल डिलिव्हरी सेवा देणा-या हमसफर या कंपनीने ओकारा ग्रुप या आघाडीच्या वाहतूक आणि माल-साठवण (लॉजिस्टिक्स) व्यवसायातील समूहाशी भागीदारी केली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर तसेच अन्य काही शहरांत ही सेवा पुरविली जाईल.  

रमणदीप सिंग आणि मेहरबान सिंग यांनी स्थापन केलेल्या ओकारा समूहाचे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात उत्तर आणि पश्चिम भारतात मोठे व्यावसायिक जाळे आहे. या नव्या भागीदारीत ओकारा फ्युलॉजिक्स प्रा. लिमिटेड महाराष्ट्रात गरज असलेल्या ठिकाणी डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज झाली आहे.   या करारानुसार हमसफर ला ओकारा फ्युलॉजिक्स कडून डिझेल वितरित करणारे १२० स्वयंचलित बाउजर्स (टँकर्स) पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. नव्या व्यवसायासाठी आवश्यक डिजिटल तंत्रज्ञान आणि तांत्रिक सहकार्यही हमसफर पुरवील.  

ओकारा फ्युलॉजिक्स मागणी जिथून येईल तिथे या तत्वावर शेतकरी, गृहनिर्माण संस्था, हॉटेल, रुग्णालये, मॉल , बांधकामाच्या साइट, कारखाने, समारंभाच्या जागा, आणि इतर मोठ्या प्रमाणावर ऑर्डर देणा-या ग्राहकांना महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये डिझेल पुरवठा करील,  असे ओकारा फ्युलॉजिक्स चे संचालक आणि सहसंस्थापक जोरावर सिंग म्हणाले.   

“ओकारा समूहाशी आम्ही केलेला करार मुख्यतः डिझेल डिलिव्हरी सेवा महाराष्ट्रात पुरवण्यासाठी आहे. याचा लाभ होऊन  हाऊसिंग सोसायटी, कारखाने, मॉल अशा ग्राहकांना नियमित स्वरूपात डिझेल खरेदी करता येईल. ग्राहकांना या सेवेमुळे पेट्रोल पंपापासून वापराच्या जागेवर डिझेल वाहून नेण्याचा त्रास वाचेल. पेट्रोल वाहतुकीच्या असुरक्षित पद्धतींचा वापरही यामुळे रोखला जाईल कारण हमसफर चे डिलिव्हरी डिस्पेन्सर अत्यंत सुरक्षित पद्धतीने इंधन वाहून नेतात, असे हमसफर चे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी हेड दिलप्रीत सदाना म्हणाले.  

हमसफर ची सेवा वापरू इच्छिणा-या ग्राहकांना ‘फ्युएल हमसफर’ या ऍप वर ऑर्डर देऊन वापराच्या ठिकाणी गरजेनुसार डिझेल मागवता येईल.  ऍप  वर ऑर्डर दिल्यावर हमसफर चा पेट्रोलिअम अँड एक्प्लोजिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन या संस्थेने प्रमाणित केलेला बाऊजर ठरलेल्या जागी इंधन घेऊन जातो. हे डिलिव्हरी ट्र्क ४००० लिटर आणि ६००० लिटर अशा क्षमतेचे असतात आणि त्यांना डिझेल विसर्ग करण्यासाठी डिस्पेन्सर बसवलेले असतात. जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानामुळे, असा ट्र्क नियोजित स्थळी पोचेपर्यंत त्याची डिझेल विसर्ग यंत्रणा लॉक केलेल्या अवस्थेत असते. त्याला अग्निशामक यंत्रणाही जोडलेली असते आणि डिलिव्हरी करण्याच्या जागेवर ठराविक परिघात सुरक्षितता पुरवली जाते. संबंधित राज्यातील डिलिव्हरी च्या दिवशीच्या करोत्तर किमतीला डिझेल पुरविले जाते, असे हमसफर संचालक आणि सहसंस्थापक सनया गोयल यांनी सांगितले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading