Saturday, September 5, 2026
NATIONAL

भारतात सीरमच्या लसीला आपत्कालीन परवानगी?

नवी दिल्ली – ऑक्‍सफर्ड ऍस्ट्रा झेन्का लसीच्या सीरम इन्स्टिट्यूट घेत असलेल्या मानवावरील चाचण्या तिसऱ्या आणि आणि अंतिम टप्प्यात आहेत. पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही घडल्यास जानेवारी किंवा फेब्रुवारीत ही लस वितरीत करता येऊ शकेल. त्यासाठी भारत सरकार आपत्कालीन परवानगी देऊ शकेल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

जर ब्रिटिश सरकारने या लशीच्या वितरणाला आपत्कालीन परवानगी दिली तर भारत सरकारही तशी परवानगी देईल, असे निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी सांगितले. ते बिझनेस टुडे या दैनिकाशी बोलत होते.

करोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक आणि संभाव्य धोका असणारे नागरिक अशा क्रमाने ही लस देण्यात येईल. त्यासाठी योग्य स्वरूपाच्या व्यवस्थापनाची सोय करण्यात आली आहे. या आठवड्यात, ही लस दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये व्यापक रोगप्रतिकारकशक्ती वाढल्याचे आढळून आले होते. त्यामुळे सर्वाधिक धोका असणाऱ्या या वयोगटाला नक्कीच दिलासा मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading