Friday, September 4, 2026
MAHARASHTRATOP NEWS

‘कराची’ एक दिवस भारताचा भाग असेल – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 23 – शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. यावर भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिकात्मक प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अखंड भारत’वर आमचा विश्वास आहे. त्यामुळे कराचीच एक दिवस भारताचा भाग असेल, असा विश्वास आम्हाला आहे.

मुंबईतील वांद्रे भागातील कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकर यांनी नुकतीच केली होती. कराची हे शहर पाकिस्तानातील असल्यामुळे या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होत, असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading