Friday, September 4, 2026
ENTERTAINMENT

आता मौसम पुन्हा होणार ऑसम – इंडियन आयडॉल 2020 च्या साथीने!

हिमेश रेशमिया, विशाल दादलानी आणि नेहा कक्कड या परीक्षकांच्या पॅनलसह इंडियन आयडॉल सुरू होत आहे 28 नोव्हेंबर रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता तो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित करण्यात येईल


सध्याच्या ‘मौसम’ मध्ये काही बदल व्हावा अशी अपेक्षा आपण सगळेच करत नाही आहोत का? अनेक महीने एका भयंकर वास्तवाचा सामना करत असलेल्या मनाला आणि हृदयाला दिलासा देण्यासाठी संगीताच्या नादाइतके चांगले काय असू शकते? या नवीन नॉर्मलमध्ये पहिल्यांदाच डिजिटल ऑडिशन्स- घर से मंच तक का सफर- यशस्वीरित्या योजल्यानंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आता इंडियन आयडॉलचे 12वे सत्र सुरू करण्यासाठी सुसज्ज आहे. इंडियन आयडॉल हा छोट्या पडद्यावरच्या सर्वाधिक लोकप्रिय प्रतिभा शोध मंचांपैकी एक आहे. फ्रेमॅंटल मीडियाद्वारा निर्मित इंडियन आयडॉल सत्र-12 टीव्ही आणि संगीत प्रेमींना रिझवण्यासाठी सज्ज झाले आहे. 28 नोव्हेंबरपासून दर शनि-रवी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर हा शो प्रसारित होणार आहे.

या सीझनसाठी प्रचंड संख्येत कलाकारांनी ऑडिशन दिल्या. यंदाच्या परीक्षकांच्या पॅनलवर विराजमान आहेत, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल दादलानी, लोकप्रिय गायिका आणि तरुण मनाची धडकन नेहा कक्कड आणि सर्वांचा लाडका हिमेश रेशमिया. त्यांनी ऑडिशन्स घेऊन थिएटर राऊंडसाठी काही मोजके कलाकार निवडले आहेत.

दर वर्षीप्रमाणे, यावेळीही इंडियन आयडॉल देशभरातून आलेल्या संगीत प्रतिभांना या मंचावर गाण्यासाठी खुले आसमंत देणार आहे. यातून पुढे येतील देशाच्या समृद्ध संस्कृतींचे, प्रदेशांचे दर्शन घडवणारे कलाकार. निवडलेल्या सर्वोत्तम 15 स्पर्धकांमधली चुरस रंगतदार होत जाईल कारण प्रेक्षक आणि परीक्षक दर आठवड्याला आपल्या आवडत्या स्पर्धकांना मत देतील आणि शेवटी देश नक्की करेल की नवीन इंडियन आयडॉल कोण आहे! 

सभ्य आणि सुरेल आदित्य नारायण या शो च्या नवीन सत्राच्या सूत्रसंचालकाच्या रूपात दिसेल आणि संगीताची ताकद आणि मोहिनी साजरी करून नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading