पुणे विभाग- 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे;
विभागात कोरोना बाधित 5 लाख 24 हजार 448 रुग्ण

पुणे,दि.22 – पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 448 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 35 हजार 425 रुग्णांपैकी 3 लाख 17 हजार 388 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 863 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.62 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 566 रुग्णांपैकी 47 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 140 रुग्णांपैकी 40 हजार 698 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 878 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 422 रुग्णांपैकी 44 हजार 326 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 408 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 688 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 895 रुग्णांपैकी 46 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 465 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 914, सातारा जिल्ह्यात 162, सोलापूर जिल्ह्यात 274, सांगली जिल्ह्यात 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 272 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 760, सातारा जिल्हयामध्ये 232, सोलापूर जिल्हयामध्ये 181, सांगली जिल्हयामध्ये 53 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 90 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 24 हजार 448 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

%d bloggers like this: