Sunday, October 25, 2026
PUNE

पर्यावरण योद्धयांचीही समाजाला गरज – खासदार वंदना चव्हाण

पुणे , दि. २२ – ‘ ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रमाबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरण योद्धयांचीही समाजाला गरज आहे .लायन्स क्लब च्या माध्यमातून अनिल मंद्रुपकर यांनी दोन्ही क्षेत्रात २ दशके दिलेले योगदान आदर्शवत आहे ,’असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण रविवारी केले.

लायन्स क्लब इको फ्रेंड्स चे संस्थापक अनिल मंद्रुपकर यांच्या स्वच्छ भारत अभियानातील आणि पर्यावरण रक्षण योगदानाबद्दल खा वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी खा चव्हाण बोलत होत्या .

त्या म्हणाल्या ,’ कार्पोरेट क्षेत्रात असतानाही मंद्रुपकर यांनी ग्रामीण भागातील समाजोपयोगी उपक्रमांसाठी,पर्यावरण रक्षण उपक्रमासांठी दोन दशके वेळ दिला . गावांमधील स्वच्छतागृहे उभारणीपासून किल्ला संरक्षण ,स्वच्छ स्वारगेट प्रकल्प ,वृक्षारोपण अशा अनेक माध्यमातून त्यांनी योगदान दिले . शहरीकरण वाढत असताना शहरी भागातही मोठ्या प्रमाणात अभिनव मार्गानी योगदान देण्याची गरज असून अनिल मंद्रुपकर यांच्यासारख्या समर्पित व्यक्तींनी त्याकडे लक्ष केंद्रित करावे .’

अनिल मंद्रुपकर म्हणाले,’ लहानपणीच मनात समाजसेवेची आस होती. १९८८ पासूनच मी लायन्स क्लब शी संबंधित आहे. केवळ निवृत्ती नंतर समाजसेवा केली जावू नये,तर समाजसेवा हा निरंतर चालू ठेवण्याचा विषय आहे.नोकरी सांभाळून उरल्या वेळेत ,साप्ताहिक सुटीच्या दिवशी प्रत्येकाने समाजकार्याला वेळ दिला पाहिजे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading