डॉ. नीलम गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांना संविधानरत्न पुरस्कार जाहीर


पुणेः-भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्यावतीने भारताच्या 71 व्या संविधान दिनानिमित्त देण्यात येणारा संविधान रत्नपुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे आणि गोरगरिब कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांना देण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स हॉलमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.गौतम बेंगाळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून भारतीय संविधानाची प्रत, भारतीय संविधानाची उद्देशिका, सन्मानचिन्ह आणि तिरंगी शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी गृहराज्य मंत्री आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे भूषविणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, अॅड. प्रमोद आडकर, नरसेविका लताताई राजगुरू, दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.माहारष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: