Tuesday, June 16, 2026
PUNE

‘दगडूशेठ दत्तमंदिराचा’ पहिला दिवा अनाथांसाठी…

पुणे : दिवाळीचा सण प्रत्येक घरात उत्साहात साजरा केला जातो. खमंग फराळ, मुलांसाठी नवे कपडे, घरामध्ये रोषणाई अशी तयारी उत्साहात केली जाते. सामान्यांप्रमाणे अनाथ मुलांना देखील दिवाळीत नव्या कोºया कपड्यांचा, फराळाच्या गोडव्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराच्यावतीने पहिला दिवा अनाथांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.   

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिला दिवा अनाथांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन मंदिराच्या आवारात करण्यात आले. डोणजे येथील आपलं घरं या संस्थेतील ३१ अनाथ मुलांना नवे कपडे, दिवाळीचा फराळ, पणत्या, आकाशकंदील देण्यात आले. परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या हस्ते मुलांना दिवाळीचे साहित्य देण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरीदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई उपस्थित होते. 
अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरीदार म्हणाले, दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशपर्वाचा सण आहे. प्रत्येक घरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. या अनाथ मुलांचे जीवन देखील प्रकाशमय व्हावे, त्यांना देखील हा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर कोरोनावर लवकर लस मिळावी आणि सर्वांचे जीवन सुखकर व्हावे अशी प्रार्थना त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading