fbpx
Thursday, April 25, 2024
Sports

पुढच्या वर्षी IPL मध्ये एक नवी टीम खेळणार !

नवी दिल्ली – यंदाच्या IPL च्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. मात्र, पुढील वर्षी सध्याच्या ८ संघांसोबत नवीन एक संघ आयपीएल खेळण्याची शक्यता आहे. द हिंदूच्या हवाल्याने एबीपीने दिलेल्या वृत्तामध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आयपीएल २०२१साठी आता जानेवारी महिन्यातच लिलाव होणार असून या लिलावात ही नवीन टीम सहभागी होण्याची शक्यता आहे. ही नवी टीम गुजरातची असू शकते, अशी माहिती मिळत आहे. २०१६ आणि २०१७ या आयपीएलच्या दोन हंगामांमध्ये गुजरातची टीम आयपीएलमध्ये सहभागी झाली होती. सुरेश रैना या टीमचा कर्णधार होता. २०१६मध्ये ही टीम क्वालिफायरमध्ये देखील पोहोचली होती. पण २०१७मध्ये गुजरात सातव्या क्रमांकावरच राहिली होती.

समान्यपणे आयपीएलसाठी लिलाव डिसेंबर महिन्यात होतो. मात्र, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे २०२१च्या आयपीएलसाठीचा लिलाव हा जानेवारी २०२१ मध्ये होणार आहे. अर्थात, आता ही आयपीएल तरी भारतात होणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुढच्या वर्षीची आयपीएल भारतातच घेण्याचे प्रयत्न करणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झालं नाहीच, तर युएई हाच दुसरा पर्याय असेल, असं देखील गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading