श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्यावतीने तीन सामाजिक संस्थांना धान्याची मदत

पुणे, दि. ४ – श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने ममता फाऊंडेशन या एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी काम करणाºया संस्थेला तसेच श्री ओम साई ओम  या मतीमंद मुलांकरीता काम करणाºया संस्थेला आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेला प्रतिष्ठानच्या वतीने ४५० किलो धान्याचे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सय्यद कांबळे, पप्पू परदेशी, किसना नखाते, राजेंद्र मोरे, भारत चौधरी, बाबूराव थोपटे, मिलींद डांगी, तानाजी शेजवळ, काजल बुद्धदेव, राहुल नायकू,संतोष सरडे आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सुर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, हेमंत रासने यांचे उपक्रमासाठी मार्गदर्शन मिळाले.
सय्यद कांबळे म्हणाले, सध्या पुण्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे दरवर्षी उत्साहात साजरे होणारे सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष मुलांसाठी काम करणाºया संस्थाना धान्यआणि जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये १५० किलो तांदूळ, १५० किलो साखर, १५० किलो गहू देण्यात आले. 

Leave a Reply

%d bloggers like this: