fbpx
Monday, May 13, 2024
ENTERTAINMENT

मूलभूत गरजा पूर्ण न झाल्‍याने नवीन क्रांती घडून येणार?

बाबासाहेब त्‍यांच्‍या वाढत्‍या काळादरम्‍यान अनेक अत्‍याचारांविराधोत खंबीरपणे उभे राहिले. या सर्वांमध्‍ये समानतेसाठी लढा हा प्रामुख्‍याने दिसण्‍यात आला. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’च्‍या आगामी एपिसोडमध्‍ये आणखी एक हृदय हेलावून टाकणारी घटना पाहायला मिळणार आहे. रामजी सकपाळ (जगन्‍नाथ निवंगुणे) व त्‍यांच्‍या कुटुंबावर अनेक अत्‍याचार करण्‍यात येणार आहेत आणि त्‍यांच्‍या समुदायाला जगण्‍यासाठी आवश्‍यक असलेले शुद्ध पिण्‍याचे पाणी मिळण्‍यापासून वंचित करण्‍यात येणार आहे. अशा स्थितीमध्‍ये बाबासाहेब (आयुष भानुशाली) आणि गावकरी या जलसंकटाचा कशाप्रकारे सामना करतील आणि या समस्‍येसाठी कशाप्रकारे उपाय शोधून काढतील? 

जगन्‍नाथ निवंगुणे म्‍हणाले, ”बाबासाहेबांनी जातीभेदाचे बळी पडलेल्‍यांना एकत्र आणण्‍यासोबत जगण्‍यासाठीच्या त्‍यांच्‍या लढ्यामध्‍ये त्‍यांचे नेतृत्‍व करत खरा संघर्ष सुरू झाला. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मूलभूत गरजांचा अधिकार आहे आणि गावातील लोकांना शुद्ध पिण्‍याचे पाणी मिळण्‍यापासून वंचित केल्‍याचे पाहून भीमरावांच्‍या मनात क्रांतीची ज्‍वाला तेवते. ही अत्‍यंत गंभीर स्थिती आहे आणि संपूर्ण समुदाय संकटात सापडल्‍यामुळे त्‍यांना जगण्‍यासाठी लढण्‍याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.” अधिक जाणण्‍यासाठी पाहा ‘एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading