fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRATOP NEWS

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली – विजय वडेट्टीवार

नागपूर, दि. ३१ – विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांची नावे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला शिवसेनेने विधानपरिषद आमदारकी देऊ केल्याची चर्चा आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उर्मिला मातोंडकरचे फोनवरुन बोलणे झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली असा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनीं केला आहे


विधानपरिषदेत जाण्यास उर्मिलाने इच्छा दर्शवली नसली तरी राज्यसभेची खासदारकी मिळावी, अशी तिची इच्छा असल्याचेही या मंत्र्याने सांगितले आहे. मात्र शिवसेनेची ऑफर उर्मिलाने स्वीकारली असल्यास, तो त्यांचा निर्णय असेल असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेच्या वादात उर्मिला मातोंडकरने कंनाच्या विरोधात जाहीर भूमिका गेत तिच्यावर हल्लाबोल केला होता.

त्यामुळेच शिवसेनेला अभिनय क्षेत्र आणि राजकारणातला तिच्यासारखा चेहरा पक्षाकडे असावा, असे वाटू लागल्याचे मतही या काँग्रस नेत्याने व्यक्त केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी काँग्रेसनेच उर्मिला मातोंडकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती, याची आठवणही या मंत्र्यांने करुन दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार तिन्ही पक्षातून कोणत्या १२ जणमांना उमेदवारी देणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंना विधान परिषद मिळणार, याबाबत जवळपास शिक्कामोर्तब आहे., मात्र त्यांना मंत्रीपद मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे. इतर पक्षातील नेत्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सोमवारी या नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading