fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTPUNE

आॅनलाईन रंगभूमीवर अवतरले संगीत शाकुंतल


पुणे :  महाराष्ट्रात संगीत नाटकांची सुदीर्घ परंपरा आहे. या परंपरेत १४० वर्षापूर्वी म्हणजेच ३१ आॅक्टोबर १८८० या दिवशी कालिदासांचे मूळ संस्कृत नाटक शाकुंतलचे  मराठी रुपांतर सादर झाले होते. या १४० वर्षाच्या काळात मराठी नाटकात अनेक परिवर्तने झाली. याच संगीत नाट्य परंपरेचे आधुनिक रुप पडद्यावर दाखविण्याचा प्रयत्न आॅनलाईन माध्यमातून करण्यात आला. संगीत नाटकांच्या गौरवशाली इतिहासाच्या  स्मृतींना उजाळा देण्यासाठी संगीत शाकुंतल मधील नाट्य गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद , पुणे शाखा प्रस्तुत शाकुंतल – मराठी नाट्यसृष्टीची नांदी या आॅनलाईन संगीत नाट्य कार्यक्रमाचे आयोजन चारुदत्त रंगभूमी या युट्यूब चॅनेलवर करण्यात आले होेते. कार्यक्रमाचे लेखन आणि संकल्पना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची आहे. वज्रांग आफळे यांनी दिग्दर्शन आणि संकलन केले. अथर्व गोखले, सौरभ ससाणे, तन्मय जक्का यांनी छायाचित्रण केले. प्रकाश योजना  गौरव जोशी यांची आहे. सागर खांबे, ओंकार बेंद्रे यांनी ध्वनी संयोजन केले. साउंड मिक्सिंग यांनी  प्रसाद जोशी केले. संजय देशपांडे यांनी संगीत मार्गदर्शन केले. तर हृषीकेश बडवे , भक्ती पागे , मेघन श्रीखंडे , संजय देशपांडे , प्रसाद जोशी , रमाकांत  परांजपे , निलेश देशपांडे  आणि चारुदत्त आफळे यांनी सादरीकरण केले आहे.
चारुद्त्त आफळे म्हणाले, अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल प्रथमच रंगभूमीवर आणले. त्याला आज १४० वर्षे झाली. महाराष्ट्रच्या या वैभवशाली नाट्य परंपरेला उजाळा देण्यासाठी या नाटकाचे प्रयोजन करण्यात आले. या मराठी नाट्य गीतांचा आनंद  अन्य भाषेतील रसिकांना घेता यावा यासाठी इंग्लिश सब टायटलिंग देखील करण्यात आले आहे. चारुदत्त रंगभूमी या https://www.youtube.com/channel/UCMbuDSWhOGceA8CBdU_sIJw चॅनेल वर हे नाटक विनामूल्य पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading