कोरोना – राज्यात आज ५ हजार ५४८ रुग्णांची वाढ; ७ हजार ३०३ कोरोना मुक्त

पुण्यात 373 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई, दि. ३१ – राज्यात शनिवारी ५ हजार ५४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

आज राज्यातील ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६७ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२ हजार ३४२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहर ..!

  • दिवसभरात 373 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 350 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 16 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    161334
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-5612
  • एकूण मृत्यू – 4227
  • एकूण डिस्चार्ज- 151495

Leave a Reply

%d bloggers like this: