मुक्ता पुणतांबेकर आणि अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर   

संस्थेचे १५० व्या वर्षात पदार्पण : महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनीला डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार 
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदाया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या वेळी महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी संस्थेला डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, मुक्तांगण मित्रच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, तर अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस डॉ. दिलीप जोग यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयएस अधिकारी सुधीर देवरे, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाºया संस्थेस देण्यात येतो. 
समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो. 

Leave a Reply

%d bloggers like this: