पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीने १९० शाळांमध्ये सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप

पुणे : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादीत पुणे संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहरातील १९० शाळांमध्ये ४०० सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझर बाटल्या, २५० सॅनिटायझर कॅन आणि ४ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा उपनिबंधक  कार्यालयात  सॅनिटायझर स्टॅन्ड, मास्क देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव, बाळकृष्ण साबळे व संस्थेचे अध्यक्ष संजय सातपुते आदी उपस्थित होते. एन.व्ही. आघाव यांनी उपक्रमाची माहिती घेतली. पुणे शहरातील, बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा, वारजे, हडपसर, येरवडा, वडगावशेरी, खडकी व पिंपरी-चिंचवड या परिसरातील १९० शाळांमध्ये या कीटचे वाटप करण्यात आले. 
संजय सातपुते यांनी संस्थेच्या ७५ वर्षांची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. सहकार खात्याचे आवाहन आणि परिपत्रकानुसार उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात उपाध्यक्ष विद्या पवार, मानद सचिव अंजली गोरे, संचालक विजय कचरे, गुलाब नेटके, डॉ. उज्ज्वला हातागळे, संजिवनी आमासे, सुरेश सोनवणे, नरेंद्र नागपुरे, धोंडीबा तरटे, महादेव माने यांचा सहभाग होता. महादेव माने यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: