IPL 2020 : आरसीबी टीम आज हिरव्या जर्सीत उतरली मैदानात

दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगळूरु संघाने यंदा १४ गुणांसह टॉप ४ मधील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. त्यातच आज होत असलेल्या चेन्नईविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित होणार आहे. त्यामुळे सध्या बंगळुरू संघ तुफान फॉर्मात आहे. खरंतर हा संघ आज एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याचं झालं असं की, बंगळुरूचा संघ आज उतरताना नियमित लाल रंगाच्या जर्सीऐवजी हिरव्या रंगाच्या जर्सीत दिसून आला. महत्त्वाचे म्हणजे ‘पर्यावरण आणि झाडांबद्दल सर्वांमध्ये जागरूकता निर्माण करणे’, हे या मागचे कारण आहे.

२०११पासून बंगळुरूचा संघ हा उपक्रम राबवतो. प्रत्येक स्पर्धेत एका सामन्यासाठी बंगळुरूचा संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करून सामना खेळतो. गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध तर २०१८ला राजस्थान संघाविरूद्ध बंगळुरूने हिरवी जर्सी परिधान करून सामना खेळला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: