एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांच्या उपस्थित प्रवेश

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मोठे व्यक्तीमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले. 

 भाजपला रामराम  करण्याची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे काल जळगावमधून  हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील होत्या. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी एक हातावर घड्याळ असल्याचा फोटो दाखवत समाजमाध्यमांवर पोस्ट केला होता. या फोटोला लाखाहून अधिक लाईक मिळाल्या होत्या. त्यांच्या हा बोलका फोटो राष्ट्रवादीत जाणार असल्याचे सूचित करीत होता. आज त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

पवार यांच्या उपस्थित  एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला. खडसे यांच्यासोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील त्यांचे काही मोजकेच समर्थकही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या सगळ्यांचे स्वागत केले. कोरोनाचे संकट असल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम असल्याने मोजक्याच लोकांना येथे येण्याची विनंती केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

Leave a Reply

%d bloggers like this: