कोरोना – राज्यात आज 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू

पुण्यात 369 नवीन पॉझिटिव्ह

मुंबई –  गेल्या 8 महिन्यापासून कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी गेल्या काही दिवसांपासून येत असलेली आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. राज्याचा Recovery Rate हा 88 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्य ही 16 लाख 31 हजार 856 एवढी झाली आहे. राज्यात दिवसभरात 7 हजार 539 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा 2.64 टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 84 लाख 2 हजार 559 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 25 हजार 197 म्हणजे 19.34 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  राज्यात आत्तापर्यंत 42 हजार 831 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

*पुणे शहर ..!
………

  • दिवसभरात 369 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 818 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 21 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
    158756
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7778
  • एकूण मृत्यू – 4066
  • एकूण डिस्चार्ज- 146912

Leave a Reply

%d bloggers like this: