आज शालेय पोषण शिक्षणाची देशाला गरज – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे, दि. 17 – एकीकडे देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे परंतु गडचिरोली ,यवतमाळ सारख्या भागात आणि देशातील विविध ठिकाणी गरिबीमुळे मुलांना पोषक आहार न मिळाल्यामुळे कुपोषित होत आहेत तर दुसरीकडे जास्त आहार झाल्यामुळे मुले लठ्ठ पणाची समस्या निर्माण होत आहे .शिवाय कोरणा सारखे विषाणूंमुळे होणारे आजार वाढत आहेत .त्यामुळे आज भारत देशाला शालेय पोषण आहार या शिक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे मत आय.आय.एम जम्मु चे अध्यक्ष व दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक अध्यक्ष मिलिद कांबळे यांनी व्यक्त केले. जूनेवेट वेलबींग या संस्थेने पोषण आहार शिक्षण पद्धती व पोषण चक्र यावर आधारित संकेतस्थळाचे उद्घाटन पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की ,लहान मुलांची अधिग्रहण करण्याची शक्ती जास्त असते .त्यामुळे या वयात पोषण आहार हा विषय अभ्यास क्रमात सहभागी झाल्यास त्याचा फायदा हा नक्कीच होईल .आणि आज कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अचानक आहार बदल करण्याची गरज पडणार नाही जे लहान वयातच पौष्टीक आहार सेवणाचा अभ्यास झाला तर.त्यामुळे देशातील सर्व शाळांमध्ये पोषण आहार हा अभ्यासाचा विषय होणे गरजेचे असल्याचे कांबळे यांनी म्हंटले .
प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका गौरी शिंगोटे यांनी जुविनेट वेलबिंग यांनी पोषण आहार शास्त्र व त्यावर आधारित आहार पोषण चक्र याचे सखोल संशोधन करून यावर आधारित शिक्षण पद्धती विकसित केली आहे .त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली .
आहारतजज्ञ डॉ.प्राची बोरा यांनी पोषण आहार हा प्रत्येक व्यक्तीला किती महत्त्वाचा आहे.ते पटवून दिले.शिवाय भारतीय परंपरेत ही पोषण आहार पद्धती महत्त्वाची होती.आता आपण आपली जुनी आहार पद्धती चा अभ्यास करून त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे .असे आपल्या मनोगतात म्हणाल्या .
यावेळी जुवेनेट वेलबिग या संस्थेचे राहुल कांबळे ,जॉर्ज मकासरे ,शांती कृष्णन आदी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: