पील-वर्क्स चा दुसऱ्या – तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार; २२५ कोटी रुपये गुंतवणार

पुणे, दि. १७ –  किराणा व्यापा-यांना मालाचा पुरवठा करणाऱ्या (बिझनेस टु  बिझनेस ) पीलवर्क्स ने भारतातील दुसऱ्या – तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असून त्यासाठी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सिद्धता केली आहे. कंपनी सध्या तायकी या स्मार्टफोन ऍप वर व्यवसाय करते आणि देशातल्या १० प्रमुख शहरांत तिचा व्यवसाय आहे.  

कंपनी स्थानिक किराणा दुकानांना नित्याच्या वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि ग्राहकोपयोगी उत्पादने पुरवते. कोरोना व्हायरस च्या साथीदरम्यान कंपनीच्या व्यवसायात दरमहा २० टक्के वाढ झाली आहे.  शहरांमध्ये गल्लोगल्ली असलेली किराणा दुकाने हा एफएमसीजी उत्पादनांच्या रिटेल (किरकोळ) विक्रीचा कणा असतो त्यामुळे कंपनीने मेट्रो शहरांच्या पलीकडे जात जास्त मोठ्या संख्येने किराणा व्यापा-यांना आपल्या व्यवसायात समाविष्ट करून त्यांना तायकी ऍप च्या  माध्यमातून अनेकविध वस्तू किफायतशीर दरात आणि त्वरित पुरवण्याची योजना आखली आहे.  

पीलवर्क्स ची सुरुवात २०१० मध्ये झाली. सुरुवातीपासूनच कंपनीने पारंपरिक रिटेल व्यवसायाचा अभ्यास करून अशा छोट्या दुकानांना आपल्या तायकी या   तंत्रज्ञानाधारित ऍप मार्फत सेवा देत त्यांच्या व्यवसायातल्या नित्याच्या अडचणींवर मात करण्यास साह्य केले आहे. सध्या या ऍप वर भारतातल्या १० प्रमुख शहरांतल्या २०,००० पेक्षा जास्त व्यापा-यांनी नोंदणी करून व्यवहार सुरु केले आहेत. कंपनीने आजवर शिराते , इन्व्हेन्टस कॅपिटल, एचडीएफसी बँक, युनिलिव्हर व्हेंचर्स, इंडियन एंजल नेटवर्क, इक्वानिमिटी आणि इतर काही गुंतवणूकदारांकडून १०० कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे.  

सध्याच्या कोरोना महामारीच्या उद्रेकात किरकोळ दुकानदारांच्या पुरवठा साखळीत अनेक अडथळे निर्माण झाले आणि त्यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तायकी ऍप चा वापर वाढला. लॉक डाउन मध्ये ग्राहक वस्तूंचा गरजेपेक्षा जास्त साठा करू लागले आणि किराणा दुकानांवर या वाढीव मागण्या पु-या करतांना ताण येऊ लागला. सॅनिटायझर, मास्क, स्वछ्तावर्धक उत्पादने अशांची मागणी वाढली आणि ती सतत मागवणे गरजेचे ठरू लागले. अशा वेळी रिटेल दुकानदारांनी इ कॉमर्स वितरण पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला.  


या महामारीने बिझनेस टु बिझनेस व्यापाराला किती मोठा वाव आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले आणि अनेक नव्या बीटुबी तंत्रज्ञान कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या पायावर आम्ही २०२१ पर्यंत ३० शहरांत आमचा व्यवसाय विस्तारण्याची आणि एक लाख व्यापा-यांना आमच्या व्यवसायात समाविष्ट करून घेण्याची योजना आखली आहे. यासाठी आम्हाला समभाग निधी (इक्विटी) आणि कर्ज अशा दोन्ही मार्गानी ३ कोटी अमेरिकन डॉलर (रु.२२५ कोटी) एवढे पैसे उभारायचे आहेत, असे पीलवर्क्स चे संस्थापक सचिन छाब्रा यांनी सांगितले.
पॅकबंद वस्तू, आरोग्यरक्षक आणि व्यक्तिगत वापराची उपादने, घरांच्या स्वच्छतेसाठीची उत्पादने आणि सफाईची उत्पादने यांना मोठी मागणी आहे. फॅमिली पॅक सारख्या मोठ्या आकाराच्या पॅक ची मागणीही बरीच वाढली आहे.  लॉक डाउन  च्या सुरुवातीच्या काळात तायकी ने पुरवठा केंद्रांची संख्या वाढवणे, ब्रँड उत्पादकांकडून थेट खरेदी करणे आणि तिजोरी हॅन्ड सॅनिटायझर, न्यूट्रा मंत्रा सॅनिटायझर, युनिबिक, मरिको , हिमालया, गोल्ड विनर, मदर डेअरी, सन्ड्रॉप अशा ज्ञात आणि नवीन स्थानिक उत्पादकांना आपल्या व्यवसायात समाविष्ट करणे या मार्गांनी स्थानिक किराणा दुकानदारांना साह्य केले. यातूनच किराणा दुकानदारांच्या ग्राहकांच्या वाढलेल्या मागण्या तायकी ने पुरविल्या.  

किरकोळ व्यापा-यांना येणा-या आर्थिक आणि साठा-वाहतूक या बाबतीतल्या अडचणींची सखोल जाण  असल्याने पीलवर्क्स  च्या तायकी  ऍपने किराणा दुकानांचे व्यवहार अधिक कार्यक्षम ठेवण्याचा निश्चय केला आहे. छाब्रा म्हणाले की विविध एफएमसी जी उत्पादनांचा पुरवठा सातत्याने करणे आणि दुकानदारांना रास्त दरात उधारीचे व्यवहार शक्य करणे यासाठी तायकी सतत प्रयत्नशील आहे. या प्रस्तावित विस्तारामुळे तायकी वापर करणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: