RPM मुळे कोविड-१९च्या काळामध्ये पेरिटोनियल डायलिसिसच्या माध्यमातून किडनी रुग्णांसाठी घेतल्या जाणा-या थेरपी सेशन्सना पाठबळ

एकीकडे देशाच्या विविध भागांमध्ये अनलॉकसाठीची धोरणे आखली जात असताना आपल्या आरोग्यव्यवस्थेचा कोविड-१९ साथीच्या फैलावाशी लढा सुरू आहे. पण हा काळ बिगर- कोविड रुग्णांसाठी, विशेषत: किडनीच्या दुर्धर आजारांशी (क्रॉनिक किडनी डिसिज) लढत असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत खडतर गेला आहे. एका पाहणीनुसार भारतामध्ये किडनीशी संबंधित आजारांचे सुमारे ०.२ दशलक्ष रुग्ण आहेत, ज्यांना वर्षाकाठी ३४ कोटी डायलिसिस सत्रांची गरज लागले. सध्या हालचालींवर आलेल्या निर्बंधांमुळे किडनीच्या रुग्णांनी खरोखरंच जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणणा-या उपचारपद्धतीच्या पर्यायांचा विचार करण्याची आणि घरच्या घरी डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस (PD) सारख्या अधिक सोयीच्या उपचारपद्धती स्वीकारण्याची गरज आहे.

पेरिटोनियल डायलिसिस  हा प्रमाण डायलिसिस उपचारपद्धतीचा एक प्रकार आहे, ज्यात रुग्णाच्या पोटातील आतल्या त्वचेचा म्हणजे पेरिटोनियमचा नैसर्गिक चाळणीसाठीचा पडदा म्हणून वापर केला जातो, ज्याच्या माध्यमातून द्रव आणि विद्राव्य पदार्थ यांची रक्ताबरोबर अदलाबदली केली जाते. ही पद्धत अतिशय सोयीस्कर, घरच्या घरी करता येण्याजोगी असून रुग्ण प्राथमिक प्रशिक्षण घेऊन आणि स्वच्छतेचे नियम पाळून ती स्वत:च पार पाडू शकतात. पेरिटोनियल डायलिसिसचे कन्टिन्युअस पेरिटोनियल डायलिसिस (सीएपीडी) आणि ऑटोमेटेड पेरिटोनियल डायलिसस (एपीडी) असे दोन प्रकार असतात. सीएपीडी मध्ये दिवसातून सुमारे ३-४ वेळा द्रवाची अदलाबदल स्वत:च केली जाते, तर एपीडी या रुग्णांची अधिक पसंती असलेल्या पर्यायामध्ये ही प्रक्रिया रात्रीच्या वेळी यांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने केली जाते.

पीडी या उपचारपद्धतीच्या अनेक फायद्यांमुळे या पद्धतीला अनेक रुग्णांकडून प्राधान्यक्रम दिले जायला हवे. खरेतर, आता, आयटी-सुसज्ज पेशंट मॉनिटरिंग सिस्टिम्स किंवा रिमोट पेशंट मॅनेजमेंट मुळे पीडी सारख्या घरच्या घरी रुग्णांची देखभाल करणा-या पद्धती डॉक्टर्स आणि रुग्ण दोहोंनाही कधी नव्हे इतक्या उपयुक्त ठरू लागल्या आहेत. या पद्धतीमुळे आजाराचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल इतकेच नव्हे तर रुग्णाच्या जीवनमानाचा एकंदरीत दर्जाही उंचावू शकेल. आज शेअरसोर्ससारख्या क्लाऊड प्रणालीवर आधारित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आरपीएम सह एपीडी ची प्रक्रिया शक्य झाली आहे जी घरी असलेला रुग्ण आणि हॉस्पिटलमधील कर्मचार्यांची टीम यांच्यामधील दुतर्फी संवाद अखंडितपणे सुरू ठेवण्यास मदत करते व गुंतागुंतीचा धोका अधिक असलेल्या रुग्णांना लगेच ओळखते.  

आरपीएम पद्धती राबविण्याबद्दल पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. तरुण जेलोका म्हणाले, सध्या सुरू असलेल्या पॅनडेमिकच्या परिस्थितीमध्ये क्रॉनिक किडनी डिसिज (सीकेडी )च्या रुग्णांना कोविड-१९ ची लागण होण्याचा अधिक धोका आहे. आज नवनव्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे आपण रुग्णांची स्थिती दुरूनही हाताळू शकतो व त्यांच्या उपचारांमध्ये काही मुलभूत सुधारणा घडवून आणू शकतो. रिमोट पेशंट मॅनेजमेंट मध्ये रुग्णाच्या घरून त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो व ही माहिती दुस-या ठिकाणी असलेल्या आरोग्यकर्मींपर्यंत मूल्यमापनासाठी आणि सल्लामसलतीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पोहोचवली जाते. रुग्णांना हॉस्पिटलच्या कमीत-कमी फे-या माराव्या लागाव्यात तसेच प्रवास कमी झाल्याने वेळ व पैशाची बचत व्हावी हे आरपीएमचे लक्ष्य आहे. दुर्धर आजाराच्या व्यवस्थापनामध्ये रिमोट मॉनिटरिंग यंत्रणेचा वापर केल्यास रुग्णाच्या आयुष्याचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारू शकतो व गुंतागुंती टाळता येऊ शकतात.”

आरपीएम मध्ये पीडी चा वापर करणा-या क्लिनिकमधील व्हर्च्युअल उपस्थितीची सोय करत, रुग्णांना क्लिनिकल डॉक्युमेंटेशन करण्याची सुविधा देत व स्वयंदेखरेखीला प्रोत्साहन देत त्यांची स्थिती सुधारण्याची क्षमता आहे. या पद्धतीमुळे डॉक्टरांना रुग्णांच्या तब्येतीची बारकाईने तपासणी करता येते व त्यांच्याशी संवाद साधता येतो, हे सुरू असतानाच आपली प्रतिक्रिया देता येते व औषधोपचारांमधील बदल आणि परिस्थितीनुसार चिकित्सात्मक निर्णयांचा आधार त्यांना देता येतो. असे केल्याने समस्यांचे वेळीच निदान होते व वेळच्या वेळी डॉक्टरांचा हस्तक्षेप झाल्याने हॉस्पिटलची फेरी टाळता येते. आरपीएम पद्धती रुग्णांचे समाधान व उपचारांचा परिणाम यात सुधारणा घडवून आणत घरच्या घरी डायलिसिस करण्याच्या पद्धतीचा अधिक प्रमाणात वापर व्हावा यासाठीची संधी पुरवते, ज्यामुळे खर्चात बचत होते. सीकेडी च्या रुग्णांना आता कोविडमुळे आपली सुरक्षितता धोक्यात न घालता आरपीएम चा यशस्वी वापर करता येणे शक्य आहे. आरपीएम मध्ये वापरलेले तंत्रज्ञान हे विश्वासार्ह आहे व ते डॉक्टर्स आणि रुग्णांना दूरस्थ पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात आणून उपचारांच्या प्रक्रियेत खरोखरंच बदल घडवून आणू शकेल. 

घरच्या घरी डायलिसिस करण्याची, विशेषत: पीडी ची प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी रुग्णाचे शिक्षण आणि प्रशिक्षण हे कळीचे मुद्दे आहेत. म्हणूनच सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आरपीएम सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पीडी प्रक्रिया केली गेल्यास रुग्णांना स्वत:ची काळजी घेण्याबद्दल अधिक ज्ञान मिळू शकेल, डायलिसिसच्या वेळी दूरस्थ पद्धतीने आपले डॉक्टर तिथे हजर आहेत असे वाटू शकेल व त्यांना या उपचारपद्धतीशी अधिक चांगल्या पद्धतीने जुळवून घेता येईल, आरोग्यकर्मीच्या संपर्कात असल्यासारखे वाटू शकेल. अशा प्रकारे हा  पर्याय त्यांच्यासाठी खूपच व्यवहार्य ठरेल. म्हणूनच ही पद्धत दूरस्थ पद्धतीने उपलब्ध आणि वापरायला सुलभ आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: